नवी दिल्ली,27 ऑगस्ट: बॉलिवूडमधले चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. कधी त्यांच्या सिनेमावरून, कधी एखाद्या भूमिकेवरून, कधी एखाद्या वक्तव्यावरून किंवा ट्विटवरून, तर कधी एखाद्या व्हिडिओवरून. अलीकडेच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याबद्दल लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती आणि त्यानंतर ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका वर्मा यांनी घेतली होती. आता मात्र त्याच पार्टीतला त्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला असून, त्यांनी स्वतःही त्या पार्टीतला फोटो ट्विट केला आहे. मॉडेल इनाया सुल्ताना (Inaya Sultana) हिच्यासोबत ते डान्स करत असल्याचं दिसत असून, तिने स्वतःच तो व्हिडिओ ट्विट केला आहे. त्या ट्विटच्या हवाल्याने ‘बॉलिवूड लाइफ डॉट कॉम’ने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे. अलीकडेच राम गोपाल वर्मा यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. त्यात ते मॉडेल आणि अभिनेत्री इनाया सुल्ताना हिच्यासह डान्स करताना दिसत होते. त्यांची एकंदर परिस्थिती पाहता ते नशेत असावेत, असं वाटत होतं. तो व्हिडिओ इनायाच्या वाढदिवसादिवशीतल्या पार्टीचा होता. त्या पार्टीत राम गोपाल वर्मा इनायासह खूपच विचित्र पद्धतीने डान्स करत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सोशल मीडिया युझर्सनी यावरून राम गोपाल वर्मा यांच्यावर खूप टीका केली होती. हा डान्स अश्लील असल्याची भावना त्यातून व्यक्त झाली होती. काही जणांनी व्हिडिओतल्या राम गोपाल वर्मा यांच्या डान्स करण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेऊन ‘त्यांनी इतकं मद्यपान करायला नको होतं’ अशा प्रतिक्रियाही अनेक युझर्सनी व्यक्त केल्या होत्या. तो व्हिडिओ बराच व्हायरल झाल्याने त्याची खूप चर्चा झाली. त्यानंतर त्यांना त्याची दखल घ्यावी लागली होती.
I officially share this video of mine and @RGVzoomin pic.twitter.com/gr80fFARnK
— Inaya Sultana (@inaya_sultana) August 25, 2021
राम गोपाल वर्मा यांनी तो व्हिडिओ शेअर करून लिहिलं होतं, की ‘या व्हिडिओत दिसणारी व्यक्ती मी नाही आणि त्यात दिसणारी तरुणी इनाया सुल्ताना नाही. मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची शपथ घेऊन हे खरं सांगतो आहे.’
हे सगळं झाल्यानंतर आता त्याच पार्टीचा दुसरा एक व्हिडिओ समोर आला आहे. इनायाने स्वतःच तो व्हिडिओ ट्विट केला असून, ‘मी राम गोपाल वर्मांसोबत डान्स करतानाचा माझा ऑफिशियल व्हिडिओ शेअर करते आहे,’ असं तिने या ट्विटसोबत लिहिलं आहे. 26 ऑगस्टला ट्विट केलेल्या या 50 सेकंदांच्या व्हिडिओला जवळपास 17 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. 300हून अधिक जणांनी तो लाइक केला असून, 37 जणांनी तो रिट्विट केला आहे.
#UninstallHotstar का होतंय ट्विटरवर ट्रेंड? या सीरिजमुळे भडकले युजर्स
राम गोपाल वर्मा यांनी स्वतःदेखील इनायासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ‘व्हायरल व्हिडिओमधली माझी सुंदर डान्सिंग पार्टनर इनाया सुल्ताना हिच्यासोबत’ अशी कॅप्शन राम गोपाल वर्मा यांनी या फोटोसोबत लिहिली आहे.