मुंबई, 30 मार्च : ‘तुला पाहते रे’ मालिका आता रंजक वळणावर येऊन पोचलीय. विक्रांत सरंजामे हाच गजा पाटील हे आता प्रेक्षकांना कळलंय. पण मोठा प्रश्न हा आहे की हे ईशाला कधी कळणार? आणि कळल्यावर विक्रांतवर जीव ओवाळून टाकणारी ईशा कशी वागणार? पुढच्या काही भागांमध्ये याचा उलगडा होणार आहे. इतके दिवस ईशाला विक्रांतनं सांगितलं की त्या माणसाचं नाव कोणाला सांगू नकोस म्हणून. पण चाणाक्ष ईशाच्या मनात बरेच प्रश्न निर्माण होतात. त्यातूनच येणाऱ्या एपिसोडमध्ये ईशाला विक्रांत हाच गजा पाटील कळतं. पुन्हा तो सरंजामेंचा जावई आहे हेही कळतं आणि धक्का बसतो. विक्रांतचा सगळा डावच तिच्या समोर उघड होतो. ती विक्रांतचा तिरस्कार करायला लागते. इकडे अगोदर ईशाशी प्रेमाचं नाटक करणारा विक्रांत आता खराखुरा तिच्या प्रेमात पडायला लागलाय. आता ईशाला कुठल्याही परिस्थितीत त्याला गमवायचं नाहीय. आता येत्या आठवड्यात मालिकेत बऱ्याच वेगवान घटना घडणार आहेत. राजनंदिनी म्हणजेच शिल्पा तुळसकर मालिकेत दिसणार आहे. राजनंदिनी ही आईसाहेबांची मुलगी आणि विक्रांत त्यांचा जावई आहे. हेही आता पुढच्या काही भागात उघड होणार आहे. सुबोध भावेनं या मालिकेत चांगल्या आणि वाईट व्यक्तीच्या छटा तेवढ्याच प्रभावीपणे साकारल्या आहेत. या मालिकेविषयी बोलताना सुबोध भावे म्हणाला होता, ‘टीव्ही माझं आवडतं माध्यम आहे. ही मालिका खूपच लोकप्रिय झालीय. अगदी मराठी भाषिक नसलेलेही मला मालिका आवडते म्हणून मेसेज करतात. या मालिकेची सुरुवात आणि शेवट मला माहीत आहे. मी मालिका एंजाॅय करतोय.’ निर्माता आणि कलाकार, सुबोधला कुठली भूमिका जास्त आवडते? यावर तो सांगतो, ’ माध्यमाशी जोडणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मग कुठलीही भूमिका असो.’ VIDEO : बीडमधील गुंडगिरीच्या आरोपाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या पंकजा मुंडे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.