जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मध्ये 'अंजली भाभी'च्या जागी आली नवी अभिनेत्री, शूटिंग झालं सुरू

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मध्ये 'अंजली भाभी'च्या जागी आली नवी अभिनेत्री, शूटिंग झालं सुरू

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मध्ये 'अंजली भाभी'च्या जागी आली नवी अभिनेत्री, शूटिंग झालं सुरू

गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांना हसवत आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 ऑगस्ट : टिव्ही जगतातील प्रसिद्ध मालिकेतील एक ‘तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)’ चं चित्रीकरण पुन्हा एकदा सुरू झालं आहे. यादरम्यान मालिकेत तारक मेहताची पत्नी ‘अंजली भाभी’ ची भूमिका साकारणारी नेहा मेहता (Neha Mehta) हिने मालिकेला अलविदा केलं आहे. अभिनेता आणि निर्मात्यांनी याबाबत सांगितले की त्यांनी 12 वर्षांनतर मालिकेतून एग्झिट घेतली आहे. यापूर्वी गुरचरण सिंह यांनी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा…(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)’ मालिकेतून बाहेर पडले होते. नेहा मेहता (Neha Mehta) हिने मालिकेतून बाहेर पडल्यानंतर निर्मात्यांची अंजली भाभीचा शोध सुरू झाला होता, आता त्याला पूर्णविराम लागला आहे.

जाहिरात

मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी मालिकेसाठी नवीन अंजली मेहता शोधली आहे. ETimes च्या बातमीनुसार टिव्ही अभिनेत्री सुनैना फौजदार (Sunayana Fozdar) आता तारक मेहताची पत्नी, ‘अंजली मेहता’ च्या भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुनैना फौजदार हिने मालिकेचं चित्रीकरणही सुरू केलं आहे. म्हणजे येत्या एपिसोड्समध्ये दर्शकांना लवकरच सुनैना फौजदार तारक मेहताची पत्नी अंजली मेहताच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सुनैना ‘अंजली भाभी’ च्या भूमिकेसाठी किती योग्य आहे हे येत्या काही एपिसोड्सनंतर प्रेक्षकच ठरवतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात