येत्या आठवड्यात 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत शंभूराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगणार आहे. संभाजी महाराजांचं मंचकारोहण झालं होतं.
शंभूराजेंनी मोघलांची उपराजधानी, दख्खनचं द्वार असलेल्या बुऱ्हाणपूरवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. त्यात ते यशस्वी झाले.
शंभूराजेंनी या विजयानंतर आता राज्याभिषेक करून घ्यावा, ही त्यांच्या निकटवर्तीयांची इच्छा होती. संभाजी महाराज अगोदर या राज्याभिषेकाला नाहीच म्हणत होते.
अनाजी पंतांनी हा राज्याभिषेक होऊ नये म्हणून बरेच प्रयत्नही केले. पण तरीही राज्याभिषेकाचा सोहळा येत्या आठवड्यात रंगणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर आता रायगडावर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होणार.
एकीकडे औरंगजेब संभाजी महाराजांना पाण्यात पाहतोय. बुऱ्हाणपुराच्या विजयानंतर औरंगजेब मनातून घाबरलाय.
राज्याभिषेकानंतर शंभूराजेंनी बऱ्याच मोहिमा फत्ते केल्या. येत्या एपिसोडसमध्ये हे सर्व पाहायला मिळणार आहे.