
सध्या सोनी मराठीवर स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका सुरू आहे. स्वराज्यरक्षक संभाजीचे निर्माते डाॅ. अमोल कोल्हे यांचीच ही निर्मिती आहे.

छोट्या जिजाला बरेच प्रश्न पडलेत. आपले वडील राजघराण्यातले असून दुसऱ्याकडे चाकरी का करतायत, असे प्रश्न जिजाऊंसमोर आहे.

या आठवड्यात छोटी जिजा एक धाडस करणार आहे. ते करून ती गढीबाहेर येईल.तिच्यातलं शौर्य सगळ्यांना दिसेल.

मालिकेत मोठ्या जिजाऊंची भूमिका अमृता पवारनं साकारलीय. सध्या मात्र जिजाऊंचं बालपण प्रेक्षकांना पाहायला मिळतंय.




