मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अदिती नव्याने पडणार सिद्धार्थच्या प्रेमात; 'तुझ्या माझ्या संसाराला..'मध्ये नाती होणार घट्ट

अदिती नव्याने पडणार सिद्धार्थच्या प्रेमात; 'तुझ्या माझ्या संसाराला..'मध्ये नाती होणार घट्ट

 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' हि मालिका आपल्या भेटीला आली आहे.

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' हि मालिका आपल्या भेटीला आली आहे.

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' हि मालिका आपल्या भेटीला आली आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, ९ सप्टेंबर- 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं'(Tuza Maza Sansarala Ani Kay Hav) हि मालिका सध्या आपल्या भेटीला आली आहे. पहिल्या दिवसापासून या मालिकेनं प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. आधुनिकतेल छेद देत यामध्ये पारंपरिक पद्धतीने एकत्र राहणारी जॉईंट फॅमिली दाखवण्यात आली आहे. यामध्ये आपल्याला सिद्धार्थ(Sidharth) आणि अदितीची(Aditi) लव्हस्टोरी पाहायला मिळत आहे. मालिकेतील नव्या प्रोमोतून सिद्धार्थ आणि अदितीचं नात अधिक दृढ होत चाललं आहे.

नुकताच मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये सिद्धार्थच्या घरात म्हशीला रेडकू होत असलेलं दाखविण्यात आलं आहे. त्यावेळी सिद्धार्थच्या घरातील लोक एखाद्या घरातील सदस्याप्रमाणे करत असतात. हे पाहून आदिती खूप भावुक होते. तिला सिद्धार्थ आणि तिच्या घरातील व्यक्तींमध्ये असलेला अफाट प्रेम माया पाहून खूप आनंद होतो. आणि ती सिद्धार्थच्या नव्याने प्रेमात पडते. आणि आपल्याला हाच सिद्धार्थ हवा असं मनाशी म्हणते.

(हे वाचा; सिद्धार्थ शुक्ला-शेहनाज गिलचा म्यूझिक VIDEO लवकरच होणार रिलीज; फोटो झाले VIRAL)

झी मराठीवर अलीकडेचा 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' हि मालिका आपल्या भेटीला आली आहे. हि मालिका लोकांच्या मनात घर करत हे. पहिल्याच दिवसापासून या मालिकेने सर्वांचा मन जिंकलं आहे. आधुनिकतेला छेद देत या मालिकेमध्ये 'जॉईंट फॅमिली' दाखविण्यात आली आहे. मालिकेत सिद्धार्थ हा जॉईंट फॅमिलीतील मुलगा दाखविण्यात आला आहे. तर आदिती हि फक्त आई-वडिलांसोबत राहते. आत्ता इतक्या मोठ्या कुटुंबात येऊन आदिती कसं सर्व सांभाळून घेणार हे पाहणं महत्वाचं आहे.

First published:

Tags: Marathi entertainment, Zee marathi serial