छायाचं राजग्यावर प्रेम आहे, हे कळल्यावर अण्णा जबरदस्तीनं छायाचं लग्न लावून देतात. राजग्याचा जीव वाचावा म्हणून मनाविरुद्ध लग्नाला होकार देते.
लग्न लागल्यानंतर अण्णा तिला सांगतात की परत घरी येऊ नकोस. तुला या घराचे दरवाजे बंद. छायाची वरात दुसऱ्या गावी जायला निघते.
आता पुढच्या भागात छायाच्या दु:खाचे दशावतार पाहायला मिळतील. त्यात अण्णांनी वकिलामार्फत राजग्यालाही गायब केलंय.