05 मार्च : शशी कपूर आणि श्रीदेवी या बॉलिवूडमधील कलाकारांना यंदाच्या ऑस्करमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. या ऑस्कर सोहळ्यात बॉलिवूडमधील या दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रीदेवी आणि शशी कपूर यांनी मोठे योगदान बॉलिवूडला दिले आहे. शशी कपूर यांनी तर हिंदीसोबत इंग्रजी सिनेमात देखील काम केले. द हाऊसहोल्डर, शेक्सपिअरवाला, बॉम्बे टॉकी, हिट एंड डस्ट असे त्यांचे इंग्रजी सिनेमे भारतातच नाहीतर परदेशातही गाजले. शशी कपूर यांचे ४ डिसेंबर २०१७ ला कोकिळाबेन रुग्णालयात निधन झाले. शशी कपूर यांना २०१४ मध्ये फुप्फुसामध्ये जंतू संसर्ग झाला होता. तर वयाच्या 54व्या वर्षी श्रीदेवींच्या मृत्यूनं सगळं जगच हादरून गेलं होतं. सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्यात. आॅस्कर सोहळ्यात यांची आठवण काढणं ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.