स्प्लिट्सविला या रिअलिटी शोमधून नावारुपास आलेली पवित्रा पुनिया छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Pavitra Punia/Instagram)
अलिकडेच ती बिग बॉसमध्ये देखील झळकली होती. यामध्ये तिनं टाकलेला ग्लॅमरचा तडका अनेकांना आवडला आहे. (Pavitra Punia/Instagram)
मात्र इतकी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवून देखील पवित्रा अद्याप बेरोजगार आहे. (Pavitra Punia/Instagram)
बिग बॉसमध्ये झळकलेल्या प्रत्येक सेलिब्रिटीला त्याच्या करिअरमध्ये उंची गाठण्याची संधी मिळते. परंतु पवित्राच्या बाबतीत मात्र असं काहीही घडलं नाही. आजही ती चांगल्या मालिकेच्या शोधात आहे. (Pavitra Punia/Instagram)
पवित्रानं अलिकडेच फ्री प्रेसला दिलेल्या मुलाखतीत तिच्या बेरोजगारीचं कारण सांगितलं. तिनं मनोरंजन क्षेत्रातील अश्लीलतेला जबाबदार धरलं आहे. (Pavitra Punia/Instagram)
ती म्हणाली, बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर तिला अनेक वेब सीरिजच्या ऑफर मिळाल्या होत्या. परंतु तिनं त्यांना नकार दिला. कारण त्यामध्ये तिला बोल्ड सीन करावे लागणार होते. (Pavitra Punia/Instagram)
प्रत्येक दिग्दर्शक तिच्याकडे बोल्ड आणि टॉपलेस सीनची मागणी करत होता. अन् असे कुठलेही सीन तिला द्यायचे नाही तिला केवळ चांगला अभिनय करायचा आहे. त्यामुळं तिनं नकार दिला. (Pavitra Punia/Instagram)
यापूर्वी असाच काहीसा प्रकार स्प्लिट्सविलानंतर तिच्याबाबतीत घडला होता. तेव्हा तर तिला काही सॉफ्ट पॉर्न चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या होत्या परंतु तिनं थेट नकार दिला. (Pavitra Punia/Instagram)
पवित्रा पुनिया यापूर्वी नागिन, ससुराल सिमर का, डायन, ये है मोहबत्तें, कवच यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. (Pavitra Punia/Instagram)
अभिनयासोबतच ती आपल्या खासगी आयुष्यामुळं देखील चर्चेत असते. सध्या ती एजाज खानसोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहात आहे. (Pavitra Punia/Instagram)