'अलीच्या कुटुंबाकडून मला खूप प्रेम मिळतं', 'तनिष्क'ची जाहिरात बॉयकॉट करणाऱ्यांना रिचा चड्डाचं प्रत्युत्तर

'अलीच्या कुटुंबाकडून मला खूप प्रेम मिळतं', 'तनिष्क'ची जाहिरात बॉयकॉट करणाऱ्यांना रिचा चड्डाचं प्रत्युत्तर

कोरोनामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) यंदाच्या वर्षात लग्नबंधनात बांधले जाणार आहेत. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे हे दोघे लग्न करू शकले नाहीत. रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाचं कार्डही छापण्यात आलं होतं.

काही दिवसांपूर्वी रिचा चड्ढाने 'तनिष्क (Tanishq Ad)' च्या जाहिरातीचं उदाहरण दिल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी रिचा चड्डा म्हणाली की, माझं आयुष्य या जाहिरातीप्रमाणे आहे. लव्ह जिहादचा आरोप करीत तनिष्कच्या या जाहिरातीवर अनेकांनी टीका केली आहे, तर सोशल मीडियावर बॉयकॉट तनिष्कच्या मागणीने जोर धरला होता. या गोंधळानंतर तनिष्कने जाहिरात मागे घेतली होती.

रिचा चड्ढा (Richa Chadha) एका मुलाखतीत म्हणाली की, माझं आयुष्य त्या जाहिरातीप्रमाणे आहे. मला अलीच्या कुटुंबातून खूप प्रेम मिळालं आहे आणि त्याला माझ्या कुटुंबातूनही खूप प्रेम दिलं जात आहे. मला त्या प्रेमहिन लोकांबद्दल वाईट वाटत आहे. यापूर्वीही रिचाने ट्विट करीत लिहिलं होतं की, ही एक सुंदर जाहिरात आहे. अली फजलने सीएएचा विरोध केला होता, ज्यानंतर मिर्जापूर 2 ला जनतेने बॉयकॉल केलं आहे. हे ही वाचा-करीना कपूरची वहिनी होणार ही प्रसिद्ध अभिनेत्री, लवकरच करणार लग्न?

याबाबत अली फजलने (Ali Fazal) एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, जेव्हा लोक एखाद्या मालिकेचा निषेध करतात तेव्हा मला वाईट वाटतं. कारण खूप जणं ही मालिका तयार करण्यासाठी एकत्र आलेले असतात. खूप जणांचा यात सहभाग असतो. त्यांना माझ्या कामाचा त्रास होत असल्याचे मला आवडत नाही.

Published by: Manoj Khandekar
First published: October 18, 2020, 6:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading