ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. अनेकदा यामुळं तिला ट्रोल देखील केलं जातं.
अनेक ट्रोलर्स तिच्या हसण्याची खिल्ली उडवतात. हसताना तिच्या हिरड्या दिसतात. तिचं हास्य मनमोहक नाही अशी टीका तिच्यावर अनेकदा केली जाते.
तिनं हसतानाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोवर तिनं ट्रोलर्ससाठी एक लक्षवेधी कॉमेंट लिहिली आहे.
ती म्हणाली, “माझ्याकडे काय ती म्हणतात ती perfect smile" वगैरे नाही. आणि तसे दात ही नाहीत…मी हिरड्या दाखवून हसते. आणि त्याची मला अजिबात लाज वाटत नाही. सगळं कसं मोजून मापून करायचं ?? त्यातून हसणं…छे !!! आहे अशी आहे. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या… दात दाखवून असो, वा खळखळून असो….मला हसायला 'आवडतं हसल्याने आयुष्य वाढतं म्हणतात…”
यापुढे ती म्हणाली, “हल्ली हसायला फार कमी मिळतंय, तेव्हा हसायची किंवा हसवण्याची संधी मिळाली तर ती सोडू नका. ते एका चित्रपटात म्हटलंय ना, क्या पता कल हो ना हो…..!!!”
तेजस्विनीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. मराठीतील अनेक नामांकित सेलिब्रिटींनी तिच्या या पोस्टचं कौतुक केलं आहे.
तेजस्विनीनं आतापर्यंत अगबाई अरेच्चा, मी सिधूताई सकपाळ, मुक्ती, ब्लफमास्टर, येरे येरे पैसा यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.