Home /News /entertainment /

‘लैला ओ लैला’ हे गाणं कसं तयार केलं?; पाहा सुपरहिट गाण्याचा भन्नाट किस्सा

‘लैला ओ लैला’ हे गाणं कसं तयार केलं?; पाहा सुपरहिट गाण्याचा भन्नाट किस्सा

लैला ओ लैला या सुपरहिट गाण्याची निर्मिती कल्याणजी आणि आनंदजी यांनी कशी केली?

    मुंबई 12 एप्रिल: लैला ओ लैला (Laila O Laila) हे गाणं बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. कुर्बानी (Qurbani) चित्रपटातील या गाण्याला आज 40 वर्ष उलटून गेली आहेत. मात्र आजही हे गाणं तितक्याच आवडीनं रसिक मंडळी गुणगुणताना दिसतात. नव्या पिढीतील प्रेक्षकांना देखील या गाण्याची भूरळ पडलेली दिसते त्यामुळंच या गाण्याला आजवर अनेकदा रिमेक करुन प्रेक्षकांसोर सादर केलं जातं. मात्र या सुपरहिट गाण्याची निर्मिती कशी झाली होती? हा तर एक गंमतीशीर किस्सा आहे. (How to make Laila O Laila song) वाचून तुम्ही देखील थक्क व्हाल. लैला ओ लैला या गाण्याची निर्मिती कल्याणजी आणि आनंदजी यांनी केली होती. 80च्या दशकात संगीत विश्वातील ही एक प्रसिद्ध संगीतकारांची जोडी होती. दिग्दर्शक फिरोज खान यांनी त्यांना एका डिस्को सॉगची निर्मिती करण्यास सांगितलं होतं. परंतु गोंधळ असा की कल्याणजी आणि आनंदजी यांनी त्यापूर्वी कधी डिस्कोत पाऊलच ठेवलेलं नव्हतं. डिस्कोमध्ये नेमकी कशा पद्धतीची गाणी वाजवली जातात त्यांना काहीच माहित नव्हतं. मग अशा परिस्थितीत त्यांनी लैला ओ लैला हे एक उडतं गाणं त्यांना ऐकवलं. अशा प्रकारच्या गाण्याला डिस्को गाणं म्हणतात हे त्यांना माहित नव्हतं. पण हे गाणं फिरोज खान यांना आवडलं. मग त्यांनी पाण्यासारखा पैसा घालवून हे गाणं तयार केलं. अन् हे गाणं प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडलं. अवश्य पाहा - ही अभिनेत्री होती Dharmendra याचं first love; तिला इम्प्रेस करायला झाले होते हिमॅन कल्याणजी यांनी अलिकडेच इंडियन आयडल या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी सायली कांबळे नामक गायिकेनं लैला ओ लैला हे गाणं गायलं होतं. हे गाणं ऐकून कल्याणजींना सॉग मेकिंगचा किस्सा आठवला. कुर्बानी हा चित्रपट 1980 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात फिरोज खान, विनोद खन्ना, झीनत अमान, आझमत खान आणि शक्ती कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. लैला ओ लैला या गाण्यावर झीनत अमान यांनी डान्स केला होता. त्यावेळी गाण्यासोबतच त्यांच्या डान्सची देखील प्रचंड स्तुती करण्यात आली होती.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Dance video, Sang a song, Song

    पुढील बातम्या