मुंबई,21 एप्रिल- मनुष्याच्या उत्क्रांतीपासूनच मानवाला रोजच्या जीवनात मनोरंजनाची गरज भासत आली आहे.तेव्हापासून मनुष्य मनोरंनासाठी विविध गोष्टी करत आला आहे. मनोरंजनामध्ये चित्रपटांचा मोठा वाटा आहे. विविध स्थानिक भाषांमध्ये सिनेमे बनतच असतात.शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा सिनेमांची निर्मीती होत असते. जगभरात काही मुख्य फिल्म इंडस्ट्री कार्यरत आहेत. या माध्यमातून विविध सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, ऐतिहासिक, ऍक्शन, थ्रिलर, हॉरर असे अनेक प्रकारचे सिनेमे बनत असतात. यामध्ये प्रामुख्याने हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड,कॉलीवूड अशा इंडस्ट्री लोकप्रिय आहेत. हॉलिवूड आणि बॉलिवूड इंडस्ट्री तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. यामध्ये अनेक दिग्गज कलाकार कार्यरत आहेत.अनेकांना असा प्रश्न पडतो हॉलिवूड, बॉलिवूड ही नावे नेमकी कशी पडली?किंवा यामध्ये ‘वूड’ हा एकच शब्द कसा वापरला जातो?
यामागे नेमकं काय कारण आहे ? असं अनेकांना वाटत असतो.आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत. (हे वाचा: IPL 2023: विराट-अनुष्काच्या लेकीबाबतची ‘ती’ गोष्ट कंगना रनौतला खटकली; ट्विट करत काढला जाळ ) मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉलिवूडची सुरुवात एच.जे.व्हीटले यांनी केली होती. म्हणूनच त्यांना हॉलिवूडचा पिता म्हटलं जातं. हॉलिवूड हे एक अतिशय छोटं शहर होतं.त्याचं लॉस अँजेल्समध्ये विलीनीकरण करण्यात आलं होतं. त्यांनंतर हे शहर अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील लॉस अँजेल्समध्ये स्थित एक जिल्ह्याच्या स्वरूपात रूपांतरित झालं होतं. याच हॉलिवूड जिल्ह्याचं नाव पुढे अमेरिकेतील सिने इंडस्ट्रीला देण्यात आलं.त्यांनंतर जगभरात अमेरिकेच्या चित्रपटांना हॉलिवूड नावाने ओळखलं जाऊ लागलं होतं. याच नावावरुन प्रेरित होत जगभरातील सिने इंडस्ट्रीनां अशी नावे देण्यात आली होती. आपल्या देशातील सिने इंडस्ट्री प्रचंड समृद्ध आहे.यामध्ये हिंदी सिनेसृष्टी अफाट मोठी आहे. ज्याला सगळे बॉलिवूड या नावाने ओळखतात. बॉलिवूडबाबत सांगायचं तर आपली सिने इंडस्ट्री महाराष्ट्रातील मुंबई या शहरात स्थित आहे.मुंबईला त्याकाळात अमराठी लोक बॉम्बे असं म्हणत होते.आणि बॉम्बेमध्ये स्थित असल्याने या इंडस्ट्रीला बॉलिवूड असं नाव देण्यात आलं होतं.
हॉलिवूडपासून प्रेरणा घेऊन हे नाव बनवण्यात आलं होतं.बॉलिवूड पाठोपाठ आपल्या देशात साऊथ सिनेमांची चलती आहे.यामध्ये तामिळ,तेलुगू अशा अनेक भाषिक सिनेमांचा समावेश होतो. यामध्ये तेलुगू इंडस्ट्रीला सोयीनुसार टॉलिवूड तर तेलुगू इंडस्ट्रीला कॉलीवूड असं नाव देण्यात आलं आहे.हॉलिवूडच्या नावावरुनच प्रत्येक इंडस्ट्रीत ‘वूड’लावण्यात आलं असल्याचं मीडिया रिपोर्ट्स सांगतात.