मुंबई, 17 आॅक्टोबर : गेली अनेक वर्ष होम मिनिस्टर हा कार्यक्रम सुरू आहे. आदेश भाऊजी आणि सर्वसामान्यांचं एक नातं तयार झालंय. सर्वसामान्यांतलं असामान्यत्व अनेकदा आपल्याला या शोमध्ये दिसतं. कधी कधी या शोमध्ये सेलिब्रिटीजही येतात आणि मग फॅन्सना मस्त धमाल अनुभवायला मिळते.
यावेळी होम मिनिस्टरचा दोन तासाचा महाएपिसोड आहे. आणि त्यात कोण खास पाहुणे आहेत ठाऊकेय का? 'चला हवा येऊ द्या' या शोचा सर्वेसर्वा डाॅ. निलेश साबळे आणि त्याची बायको डाॅ. गौरी. यांच्या घरी आदेश भाऊजी जाऊन छान सोहळाच रंगणार आहे. निलेश आणि त्याची बायको गौरी आयुर्वेदिक डाॅक्टर आहेत. त्यांचे किस्से, त्यांची गुपितं उलगडणार आहेत.
चला हवा येऊ द्या आणि होम मिनिस्टर या दोन्ही शोजचा प्रेक्षकवर्ग बराच मोठा आहे. त्यामुळे आदेश भाऊजी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये निलेश आणि गौरीची फिरकी घेणार. त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारणार.
आदेश बांदेकर आणि निलेश साबळे यांची आपापली वेगळी लोकप्रियता आहे. सध्या दोन्ही शोजचा टीआरपी कमी झालाय. म्हणून वाहिनीनं ही शक्कल लढवली असावी. दोन लोकप्रिय सूत्रसंचालक एकत्र आणून वेगळी समीकरणं जुळवणार असल्याचं दिसतंय.
कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे म्हणत निलेश साबळे सगळ्यांच्याच घराघरात पोचलाय, तर आपल्या नेहमीच्या प्रेमळ वागण्यातून आदेश बांदेकर सगळ्यांनाच आपलेसे वाटतात.
मध्यंतरी चला हवा येऊ द्या या शोने प्रेक्षकांची रजा घेतली होती. त्यानंतर या मालिकेनं परदेश दौरेही केले होते. होम मिनिस्टर 2004पासून अव्याहत सुरू आहे. मधले काही महिने आदेशच्या जागी जितेंद्र जोशी आला होता. पण नंतर पुन्हा आदेश भाऊजींच्या जादूचीच गरज लागली.
20 वर्षांपूर्वी सलमानची 'वधू' पळवून नेली होती शाहरुखनं, करणनं ताज्या केल्या आठवणी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Adesh bandekar, Home minister, Nilesh Sable, आदेश बांदेकर, निलेश साबळे