मुंबई, 12 ऑक्टोबर : आईवडील होण्याचा निर्णय घेणं ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट असते. पण एका अभिनेत्रीने आई होण्यास नवऱ्याला राजी करावं यासाठी चक्क नेटकऱ्यांनाच गळ घातली आहे. छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री 'माही विज' (Mahhi vij) हिला दुसऱ्यांदा आई होण्याची इच्छा आहे. पण तिचा पती जय भानुशाली (Jay Bhanushali)ला हा निर्णय पटला नाही.
माही आणि जय यांना आता एक वर्षाची मुलगी आहे. तिचं नाव 'तारा' भानुशाली आहे. पण 'माही'ला लॉकडाऊनच्या काळात पुन्हा आई होण्याची इच्छा आहे. पण माहीच्या या विचाराला जयने नकार दिला. शेवटी माहीने चक्क नेटकऱ्यांना गळ घातली आहे. अशीच पोस्टच माहीने इन्स्टाग्राम (Instagram) वर शेअर केली आहे. तिनं आपल्या स्टोरीमध्ये लिहलं आहे की, "प्लीज जयला कोणीतरी समजवा त्याच्या इन्स्टाग्रामवर जाऊन कॉमेंट्समध्ये त्याला सांगा की, माहीला पुन्हा आई व्हायचं आहे. सध्या लॉकडाऊनमुळे मी खूप कंटाळले आहे. मला आणखी एक मुल हवं आहे."
माही विज आणि जय भानुशाली हे हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमधलं लोकप्रिय कपल आहे. एका पार्टीमध्ये त्यांची भेट झाली होती. त्यानंतर मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर हळुहळु प्रेमात झालं. 2011 साली त्याचं लग्न झालं. त्यानंतर 2019 मध्ये माही आणि जय यांच्या घरामध्ये लहानग्या ताराचं आगमन झालं. माही इन्टाग्रामवर बरीच अॅक्टीव्ह असते. तारा आणि जयसोबत अनेकदा ती फोटो आणि व्हिडीओज् शेअर करत असते.
जय भानुशालीने आत्तापर्यत अनेक हिंदी मालिका आणि रिअॅलिटी शोजमध्ये काम केलं आहे. मिठी छोरी नंबर 1, निलांबरी, कहानी घर घर की, कैरी: रिश्ता खट्टा मिठा अशा अनेक मालिकांमध्ये त्याने नाव गाजवलं आहे. तर माहीनेही हिंदीसोबतच दाक्षिणात्य मालिकांमध्येही काम केलं आहे.