हिनाची नवी पोस्ट पाहून चाहते तिला अफाट प्रश्न विचारत आहेत. हिना खानने नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने 'टाईम टू ब्रेकअप'या शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत. हिनाच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ब्रेकअपबद्दल इतके प्रश्न विचारले आहेत, की हिना खान ट्विटरवर ट्रेंड होत आहे.हिना खानला मोठ्या प्रमाणात ब्रेकअपवर प्रश्न विचारण्यात येत आहेत. त्यामुळे ती ट्विटरवर ट्रेंड झाली आहे. एका युजरने प्रश्न करत विचारलं आहे 'मॅडम रॉकी जयस्वालसोबत ब्रेकअप तर झाला नाही ना?'. तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे 'हे देवा मला हिना खानसाठी भीती वाटत आहे. त्यांच्या ब्रेकअपवर इतके ट्विट केले जात आहेत. हे काय चाललंय'.Omg i m sh!t scarred now HINA KHAN is trending and tweets are full of her breakup.... @eyehinakhan yeh kya hora hai #HinaKhan pic.twitter.com/z4sDyEldCr
— ℕ ℍℕ (@momina_khan01) October 8, 2021
तर काहींनी हे आगामी एखाद्या अल्बमसाठी असल्याचाही अंदाज व्यक्त केला आहे. तर इतर युजर्सनी अभिनेत्री हिना खानबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तर एका युजरने लिहिलं आहे. 'हिना खान तू अशी उदास नको होऊ. तुलानेहमी हसतखेळत पाहून चांगलं वाटतं'. या सर्व ट्विट्स दरम्यान हिना खान ट्विटवरवर ट्रेंड होत आहे. (हे वाचा:दुबईच्या रस्त्यावर ऐश्वर्या रॉयला भेटली पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खान!) अभिनेत्री हिना खान आई रॉकी जयस्वाल गेली अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत. हे दोघेही सतत एकमेकांसोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसून येतात. या दोघांची भेट 'ए रिश्ता क्या केहलाता है' मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेने हिनाला अक्षरा ही ओळख मिळवून दिली होती. मालिकेमुळे अभिनेत्री प्रचंड लोकप्रिय झाली आहे. तर याच मालिकेत रॉकी जयस्वाल हा सुपरवायझिंग प्रोड्युसर होता. हिना खानने लोकप्रिय शो 'बिग बॉस'मध्ये सहभाग घेतला होता. यावेळी रॉकी जयस्वाल त्याला सपोर्ट करण्यासाठी शोमध्ये पोहोचला होता.Don't be sad Hina Khan, we can't see you like this always be smile and happy, you are Okey ? HINA KHANpic.twitter.com/tavjrTH5Rl
— Janvi Patel 89💞❤ (@89_janvi) October 8, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Hina khan