मुंबई 13 मार्च: टिकटॉक, इन्स्टाग्रामसाख्या व्हिडिओ शेअरिंग अॅपमुळं डिजिटल व्हिडिओ कंटेंटचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. अनेक क्रिएटर्स आश्चर्य चकित करणाऱ्या व्हिडीओंची निर्मिती करताना दिसतात. भव्या कृष्णन ही देखील अशाच नामांकित व्हिडाओ क्रिएटर्सपैकी एक आहे. तिनं नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील हसून हसून लोटपोट व्हाल.
भव्याची आई 10 दिवसांसाठी सहलीला गेल्यानंतर घराच्या स्वच्छतेची जबाबदारी ती आणि तिच्या वडिलांवर येऊन पडली. याच संधीचा फायदा घेत या बाप-लेकीने एक क्रिएटिव्ह व्हिडिओ तयार केला आहे. फिर हेराफेरी या सुपरहिट चित्रपटात हिमेश रेशमियाने गायलेलं ‘ए मेरी जोहराजबी’ हे गाणं आहे. त्याचा व्हिडिओ रिमेक त्यांनी केला आहे.
अवश्य पाहा - आलिया भट्टला डच्चू; 200 कोटींच्या चित्रपटात या फ्लॉप अभिनेत्रीची वर्णी
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये भव्या आणि तिचे वडिल डोळ्यांना गॉगल लावून उभे आहेत. घरसफाईसाठी वापरला जाणारा मॉप उलटा धरून त्याचा माईकसारखा वापर त्यांनी केला आहे. हिमेशचं गाणं सुरू होतं आणि हे दोघंही चित्रपटातल्या डान्सस्टेप्सप्रमाणे खांदे हालवून आणि माईकवर गाणं म्हणून सादरीकरण करतात. प्रत्यक्ष गाणं सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्यावर चित्रित झालंय त्यात त्यांनी मॉपचा माइक म्हणून वापर केला आहे. तसाच या बाप-बेटीने केला आहे. दोघंही गाणं म्हणतात. डिस्को लाइट चालू बंद होतात. नंतर वडिल हवेत रूम फ्रेशनर मारतात आणि दोघंही नाचता असं या व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडओमध्ये वरच्या बाजूला भव्यानी लिहिलंय, ‘मला आणि माझ्या वडिलांना घर स्वच्छता करण्यासाठी एकटं सोडून जेव्हा माझी आई जाते तेव्हा.’ भव्यानी इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर 7 मार्चला हा व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्टापोस्टमध्ये तिनी लिहिलंय, ‘माझी आई 10 दिवस सहलीला गेल्यावर मी आणि माझ्या वडिलांनीच घर स्वच्छ करायचं ठरवलं. आमच्या घरात रूम फ्रेशरनर दरवळतोय.’
इन्स्टाग्रामवर 4000 वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला असून 500 लाइक्स मिळाले आहेत. 50 जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानी व्हिडिओ क्यूट आणि क्रेझी असल्याचं म्हटलंय तर दुसऱ्यानी सुपर कूल डॅड म्हणत भव्याच्या वडिलांचं कौतुक केलंय.
ट्विटरवर या व्हिडिओला 16 हजार व्ह्यूज आणि 1600 लाइक्स मिळालेत. काहींनी बापलेकीच्या प्रेमाचं कौतुक केलंय तर एकाने द मोस्ट अडोरेबल थिंग एव्हर म्हटलंय. तुझ्या वडिलांकडून डान्स स्टेप्स शिकून घ्यायला हव्यात असंही एकाने म्हटलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Entertainment, Funny video, Tik tok