मुंबई, 16 जुलै- मराठी अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांच निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तानं मनोरंजन विश्व हादरून गेलं आहे. मावळच्या तळेगाव दाभाडील आंबी येथील घरात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. यानंतर सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली व लोकांच्या यावर वेगवेगळ्या प्रितिक्रिया देखील आल्या. मनोरंजन विश्वासाठी हा मोठा धक्का होता. यावर अभिनेत्री हेमांगी कवीनं नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. सध्या हेमांगीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेमांगी कवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. विविध विषयावर हेमांगी मत मांडताना दिसते. हेमांगीनं रवींद्र हनुमंत महाजनी यांच्या निधनाविषयी एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. हेमांगीनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की,आपण कोण झालो आहोत? वाचा- प्रभासचं नाहीतर आमिर देखील नाही मोडू शकला शाहरूखचं एक रेकॉर्ड ; जगभरात झाली… काल जेष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी गेल्याचं कळलं. अर्थात आधी Social Media वरून नंतर news channel मधून. पण ते गेल्याची पेक्षा ते ‘कसे’ गेले याचीच ‘बातमी’ सर्वत्र जास्त पसरली! जाणाऱ्याला नीट जाऊ तरी द्या रे! Ofcourse बातमी देणाऱ्यांची आता ती style च झालीए बातम्या अशाप्रकारे लोकांपर्यंत पोचवण्याची! त्याशिवाय लोकं बातमीच बघत नाहीत असं त्यांना वाटतं. त्यांचा दोष नाही, शेवटी प्रत्येकाला पोट आहेच.
पण त्या बातमीवर आलेल्या comments वाचून माणूसपणाची सिसारी आली. ते इतकं अंगावर आलं की श्रध्दांजली वाहणं नकोसं झालं! त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही ही माहीत नसताना वाट्टेल ते बोलत सुटले लोक! त्यांच्या मुलाबद्द्ल, पत्नीबद्दल! असं मरण अनेक लोकांना येत असावं पण केवळ ते अभिनेते होते, प्रसिद्ध होते म्हणून वाट्टेल ते बोलण्याचा परवाना घेतला आपण! ज्या Hero ला आपण लहानपणापासून पहात आलोय त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळणं खुप Surreal वाटतं मला! ‘रंगीबेरंगी’ सिनेमात तुमच्या सोबत तुमच्या मुलीचं काम करण्याचं भाग्य मला लाभलं! रविंद्रजी जिथं कुठं आहात तिथं शांत असाल आणि आम्हांला माफ कराल अशी मी आशा करते!
Gashmeer Mahajani आधीच इतका struggle करून उभा आहेस, त्यात आता याची भर! Really very very sorry!And Strength to you, boy! Yes, Social Media वर किंवा कुठेही व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे पण जरा तार्तम्य ठेवलं तर नाही का चालणार? बातमी देणाऱ्यांना चेहरा नाही पण आपल्याला आहे! हे थोडं लक्षात ठेऊया! बास! #RavindraMahajani #रविंद्रमहाजनी 🙏🏽..हेमांगीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय अनेकांनी कमेंट करत आपलं मत देखील नोंदवलं आहे.