मुंबई, 24 फेब्रुवारी- हॉलिवूड निर्माता आणि ऑस्कर विजेत्या हार्वे विन्स्टाईनवर असलेल्या बलात्कार प्रकरणात काल अखेर कोर्टाने निर्णय जाहीर केला आहे. या हॉलिवूड निर्मात्याला कोर्टाने 16 वर्षांची शिक्षा सुनावत आपली सुनावणी पूर्ण केली. या निर्मात्यावर एका इटालियन अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप होता. इतकंच नव्हे तर तब्बल 80 महिलांनी या निर्मात्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत.
ऑस्कर विजेता हॉलिवूड निर्माता अशी हार्वे विन्स्टाईनची ओळख आहे. या निर्मात्यावर इटालियन अभिनेत्रीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. 2013 मध्ये केलेल्या या तक्रारीवर कोर्टाने गुरुवारी निणर्य सुनावला आहे. या अभिनेत्रीची ओळख जाहीर करण्यात आलेली नाहीय. मात्र 70 वर्षांच्या हार्वे विन्स्टाइनला 16 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
(हे वाचा: Akshay Kumar: अखेर तो दिवस आलाच! अक्षय कुमार सोडणार कॅनडाचं नागरिकत्व,पासपोर्ट बदलण्याची तयारी सुरु)
काही दिवसांपूर्वी जगभरात 'मीटू' मोहीम मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली होती. या मोहिमेत अनेक महिलांनी समोर येत आपल्याबाबत घडलेल्या लैंगिक अत्याचारांवर उघडपणे भाष्य करत आरोपींची नावे उघड केली होती. याच दरम्यान तब्बल 80 महिलांनी समोर येत हॉलिवूड निर्माता हार्वे विन्स्टाईनवर लैंगिक अत्याचार आणि अश्लील वर्तवणुकीचे आरोप करत गुन्हा दाखल केला होता.
Los Angeles: Former Hollywood film producer Harvey Weinstein sentenced to 16 years in prison for rape & sexual assault of Italian actor in 2013, reports AP
Sentence comes on top of the more than 20 years Weinstein has left to serve for 2020 conviction in New York. (File pic) pic.twitter.com/84FHVIgkJ7 — ANI (@ANI) February 23, 2023
हार्वे विन्स्टाईन याआधीच लैंगिक अत्याचाराची23 वर्षांची शिक्षा भोगत आहे. या सुनावणीला तो कोर्टात व्हीलचेअरवर उपस्थित होता.70वर्षांच्या हार्वे विन्स्टाईनला कोर्टाने 16 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आपल्याला जन्मठेप देऊ नका... यामध्ये काही गोष्टी चुकीच्या आहेत अशी विनवणी त्यांने कोर्टात केल्याचं रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र कोर्टाने आरोपीची विनवणी धुडकावून लावत 16 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
वृत्तसंस्था, एएनआयने याबाबत एक ट्विट करत माहिती दिली आहे. '' माजी हॉलिवूड चित्रपट निर्माते हार्वे विन्स्टाईन यांना 2013 मध्ये इटालियन अभिनेत्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.विनस्टाईनला 2020 प्रकरणात न्यूयॉर्कमध्ये 20 वर्षांहून अधिक काळ शिक्षा सुनावण्यात आली आहे''.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Hollywood