मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Supriya Pilgaonkar B'day: सुप्रिया पिळगावकरांचा वाढदिवस लेकीने बनवला खास; शेअर केले Unseen Photo

Supriya Pilgaonkar B'day: सुप्रिया पिळगावकरांचा वाढदिवस लेकीने बनवला खास; शेअर केले Unseen Photo

मराठीतील अत्यंत लोकप्रिय जोडी अशी अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि सचिन पिळगांवकर यांची ओळख आहे. या जोडीने मराठी पडदा गाजवला आहे.या जोडप्याला एकुलती एक लेक आहे.

    मुंबई,16 ऑगस्ट-  मराठीतील अत्यंत लोकप्रिय जोडी अशी अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि सचिन पिळगांवकर यांची ओळख आहे. या जोडीने मराठी पडदा गाजवला आहे.या जोडप्याला एकुलती एक लेक आहे.जी सध्या चित्रपटांपासून वेबसीरिजमध्ये भन्नाट कामगिरी करत आहे.आज ज्येष्ठ अभिनेत्री आणि श्रियाची आई सुप्रिया यांचा वाढदिवस आहे.यानिमित्ताने श्रियाने आपल्या आईसोबतचे अनेक कधीही न पाहिलेले असे फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रिया पिळगांवकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या प्रोजेक्ट्स आणि पर्सनल लाईफबाबत सोशल मीडियावरून माहिती देत असते. श्रिया आपले ग्लॅमरस फोटोही शेअर करत असते. अनेकांना श्रिया आपल्या आईची म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रियांची हुबेहूब कार्बन कॉपी वाटते. कारण श्रियाचं स्मितहास्य अगदी सुप्रियांसारखंच आहे. या दोघी मायलेकींमध्ये फारच छान बॉन्डिंग आहे. या मायलेकी एखाद्या मैत्रिणींसारख्या वावरतात. श्रिया सतत आपल्या आईबाबांसोबतचे फोटोही शेअर करत असते. नुकतंच श्रियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्रीने आपल्या आईसोबतचे थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. आज ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया आपला वाढददिवस साजरा करत आहेत. आज त्या आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहेत. श्रियाने आपल्या बालपणापासून ते लेटेस्ट फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोंमध्ये दोघींच्या चेहऱ्यावर सुंदर असं हास्य दिसून येत आहे. (हे वाचा:Raj Hanchanale: बायकोला शुभेच्छा देत सनी दा झाला भलताच रोमँटिक; म्हणाला, हे हॉट्टी... ) श्रिया पिळगांववकरने 'एकुलती एक' या मराठी चित्रपटातून आपल्या करिअरची सुरवात केली होती. यामध्ये ती आपले बाबा आणि ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्यासोबत झळकली होती. त्यांनतर श्रियाने अनेक भाषांमध्ये काम केलं आहे. ती शाहरुख खानच्या 'झिरो'मध्येही झळकली होती. सोबतच श्रिया अनेक हिंदी वेबसीरिजमध्ये दिसली आहे.आगामी काळात श्रिया भुवन बामसोबत एका वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Instagram post, Marathi actress, Marathi entertainment

    पुढील बातम्या