बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर एक लोकप्रिय चेहरा आहे. अभिनेत्री लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर असली तरी ती नेहमीच चर्चेत असते. सध्या ही अभिनेत्री आई बनणार आहे. दरम्यान सोनम आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अभिनेत्रीच्या नेटवर्थ आणि कार कलेक्शनबाबत जाणून घेऊया.
सोनम कपूर अभिनेत्रीसोबतच एक बिझनेस वुमेनसुद्धा आहे. ती एका ब्रँडची सह-मालक आहे. शिवाय तिने बिझनेसमॅन असणाऱ्या आनंद अहुजासोबत लग्न केलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सोनम कपूरजवळ 13 मिलियन अमेरिकी डॉलर इतकी संपत्ती आहे. भारतीय भाषेत सांगायचं झालं तर सोनम तब्बल 95 कोटींची मालकीण आहे.
सोनम कपूर विविध ब्रँडच्या जाहिराती, चित्रपट, रियल इस्टेट गुंतवणूक, स्वतःचा व्यवसाय, होस्टिंग अशा विविध पद्धतीने कोटींची कामे करत असते.
सोनम एका चित्रपटासाठी 2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रुपये आकारते. शिवाय अभिनेत्री वर्षाला 6 कोटींची कमाई करते.
सोनम कपूरला महागड्या कारची प्रचंड आवड आहे. अभिनेत्रीजवळ मर्सिडीज मेबॅक, मर्सिडीज बेन्ज, मर्सिडीज बेन्ज S400, ऑडी, बीएमडब्ल्यू, टाटा सफारी, लँड रोव्हर रेंज रोव्हर, लॅम्बोर्गिनी अशा विविध कारचं कलेक्शन आहे.