मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शिवाजी राजे...ते नागरिक, मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या सचिन खेडेकरांचे हे 5 चित्रपट पाहाच

शिवाजी राजे...ते नागरिक, मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या सचिन खेडेकरांचे हे 5 चित्रपट पाहाच

आजतागायत त्यांनी अनेक सुपरहिट नाटकं आणि चित्रपटांध्ये काम केलं आहे. कधी रोमँटिक हिरो, कधी वडील, कधी भाऊ तर कधी चित्रपटातील क्रूर खलनायक अशा विविध भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं आहे.

आजतागायत त्यांनी अनेक सुपरहिट नाटकं आणि चित्रपटांध्ये काम केलं आहे. कधी रोमँटिक हिरो, कधी वडील, कधी भाऊ तर कधी चित्रपटातील क्रूर खलनायक अशा विविध भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं आहे.

आजतागायत त्यांनी अनेक सुपरहिट नाटकं आणि चित्रपटांध्ये काम केलं आहे. कधी रोमँटिक हिरो, कधी वडील, कधी भाऊ तर कधी चित्रपटातील क्रूर खलनायक अशा विविध भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 14 मे: सचिन खेडेकर खेडेकर (Sachin Khedekar) हे मराठी मनोरंजसृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मराठीसोबतच हिंदी, तमिळ आणि तेलुगु या चित्रपटांमध्येही आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे. आज सचिन यांचा वाढदिवस आहे. (Happy Birthday Sachin Khedekar) 56 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 1990 पासून आजतागायत त्यांनी अनेक सुपरहिट नाटकं आणि चित्रपटांध्ये काम केलं आहे. कधी रोमँटिक हिरो, कधी वडील, कधी भाऊ तर कधी चित्रपटातील क्रूर खलनायक अशा विविध भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं आहे.

मात्र 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही असे पाच आहेत जे त्यांच्या प्रत्येक चाहत्यानं पाहावं असं त्यांना वाटतंय. या चित्रपटांमध्ये तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीचे सचिन खेडेकर पाहायला मिळतील असा विश्वास त्यांना वाटतो. तर मग पाहूया हे चित्रपट आहेत तरी कुठले...

टेक केअर गुड नाईट – हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा एक सायबर क्राईमवर आधारित असलेला चित्रपट आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर यांनी सुधीर देशपांडे ही व्यक्तिरेखा साकारली होती.

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय – हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये सचिन यांनी दिनकर भोसले नामक एका मध्यमवर्गीय व्यक्तीची भूमिका साकारली आहे. मराठी भाषा आणि शिवाजी महाराज यांच्या विचारांवर हा चित्रपट आधारित आहे. या सुपरहिट चित्रपटामुळंच सचिन खेडेकर यांना खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळाली होती.

कच्चा लिंबू – हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. मानसिकदृष्ट्या कमकूवत असलेल्या एका लहान मुलाची स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर यांची भूमिका फार मोठी नव्हती तरी देखील हा चित्रपटा चाहत्यांनी नक्की पाहावा असा सल्ला त्यांनी दिला होता.

नागरिक – हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. महाराष्ट्रातील राजकारणावर आधारित या चित्रपटाची पटकथा आहे. यामध्ये सचिन यांनी श्याम जगदाळे ही भूमिका साकारली होती. यामध्ये त्यांनी केलेल्या अभिनयाची सर्वत्र स्तुती करण्यात आली होती.

नेताजी सुभाषचंद्र बोस – नावावरुनच सर्वांच्या लक्षात येईल हा चित्रपट क्रांतिकारक सुभाषचंद्र बोस यांच्यावर आधारित होता. यामध्ये सचिन खेडेकर यांनी सुभाषबाबूंची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं होतं.

या पाच चित्रपटांमध्ये तुम्हाला सचिन खेडेकर यांच्या नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिका पाहायला मिळतील. या चित्रपटांसाठी जगभरातील समिक्षकांनी सचिन खेडेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. दोन वर्षांपूर्वी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या चित्रपटांचा आनंद घेण्यास आपल्या चाहत्यांना सांगितलं होतं.

First published:

Tags: Bollywood actor, Entertainment, Sachin khedekar