मुंबई, 2 एप्रिल- आपल्या डान्स मूव्हजने सर्वांनाच वेड लावणारा कोरियोग्राफर म्हणजे रेमो डिसुझा (Remo D’Souza) होय. मोठमोठ्या सेलेब्रेटींना आपल्या तालावर नाचवलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रेमो हा एक अष्टपैलू कलाकार आहे. त्याने कोरिओग्राफर, अभिनेता आणि दिग्दर्शक या तिन्ही क्षेत्रात आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. रेमो हा या पिढीचा सर्वात आवडता डान्सर-कोरियोग्राफर आहे. लोक त्याच्यासोबत काम करण्याचं स्वप्न पाहतात. तो अनेक डान्स रिअॅलिटी शोजमध्ये परीक्षक म्हणून दिसला आहे. हा कलाकार आज 2 एप्रिलला आपला 48 वा वाढदिवस (Remo D’Souza Birthday) साजरा करत आहेत. रेमोने दिग्दर्शित केलेले चित्रपट- रेमोने काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. ‘एनी बडी कॅन डान्स’ हा त्यांच्या दिग्दर्शनाचा पहिला चित्रपट होता. यानंतर त्यांनी ‘फालतू’, ‘एबीसीडी 2’, ‘अ फ्लाइंग जट’, ‘स्ट्रीट डान्सर 3डी’ आणि ‘रेस 3’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. यामधील जास्तीत जास्त चित्रपट डान्सवर आधारित होते. रेमोने कोरियोग्राफ केलेले सॉन्ग- 1)ये जवानी है दिवानी मधील बालम पिचकारी: रणबीर आणि दीपिका असलेल्या या गाण्यासाठी, रेमोने त्या वर्षी जवळजवळ सर्व पुरस्कार जिंकले आहेत. आयफा अवॉर्ड्स, स्क्रीन अवॉर्ड्स, झी सिने अवॉर्ड्सपासून ते प्रोड्यूसर्स गिल्ड अवॉर्ड्सपर्यंत प्रत्येक कार्यक्रमात रेमो परीक्षकांची पहिली पसंती होता. त्याच्या दोन्ही डान्स ट्रॅकचे हुक स्टेप्स खूप लोकप्रिय झाले होते आणि आजही आहेत. 2)‘बाजीराव मस्तानी’चा पिंगा: या गाण्यासाठी रेमोला 64 व्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनमध्ये नामांकन मिळाले होते. या गाण्यावर प्रियांका चोप्रा आणि दीपिकाने परफॉर्मनस केला होता.यासाठी त्यांना ‘प्रोड्यूसर्स गिल्ड फिल्म अवॉर्ड’ सुद्धा देण्यात आला होता. 3)AABCD: मधील सुन साथिया : रेमोने या गाण्यात जबरदस्त रोमँटिक डान्स मूव्ह्स बसविल्या होत्या. हे गाणं सर्वांनाच पडलं होतं. श्रध्दा आणि वरुणने रेमोच्या डान्स मूव्ह्ज सुंदरपणे सादर केल्या होत्या. 4)‘स्टुडंट ऑफ द इयर’चे डिस्को दिवाने: सुंदर हुक स्टेप्स असलेलं एक आकर्षक हिट गाणं होतं. रेमोच्या कोरिओग्राफीमध्ये आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्राची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. 5)‘कलंक’चे घर मोरे परदेसिया: ‘घर मोरे परदेसिया’ या प्रसिद्ध गाण्यातील त्याच्या कोरियोग्राफीसाठी, रेमोला सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शकाचा 65 वा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.