मुंबई, 14 डिसेंबर : साऊथचा सुपरस्टार राणा दग्गुबाती (Rana Daggubati) याचा आज वाढदिवस (Birthday) आहे. त्यानं अनेक मोठं-मोठ्या चित्रपटांत काम केलं आहे. बॉलिवूडमध्येही (Bollywood) आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे. एक कलाकार म्हणून चित्रपट करिअरमधला त्याचा प्रवास खरंच खूप कौतुकास्पद आहे. त्यांनं अनेक सिनेमांत (Cinema) काम केलं असलं तरी त्याला खरी ओळख मिळाली ती 'बाहुबली'तील (Bahubali) भल्लालदेवच्या (Bhallaldev) भूमिकेमुळं. राणा दग्गुबाती यानं भल्लालदेवची साकारलेली भूमिका आजही लोकांच्या मनात घर करून आहे. बाहुबली चित्रपटाचा मुख्य अभिनेता प्रभास होता, पण राणाशिवाय या चित्रपटचा विचारही केला जाऊ शकत नाही. कारण व्हिलन (अॅन्टीगॉनिस्ट) जितका मोठा, तगडा आणि खूंकार असतो, तेवढा हिरोचा (प्रोटोगॉनिस्ट) संघर्ष मोठा असतो. म्हणून आज प्रभासच्या अभिनयाचं जेवढं कौतुक केल जात आहे, त्यामध्ये भल्लालदेवच्या व्यक्तीरेखेचाही तितकाच हात आहे.
भल्लालदेवच्या भूमिकेसाठी राणाने तयारी कशी केली ?
भल्लालदेव बनण्यासाठी राणाने अपार मेहनत घेतली होती, हे आपण सर्वांनी पडद्यावर पाहिलंच आहे. असं म्हटलं जात की, भल्लालदेवची भूमिका साकारण्यासाठी राणाला दररोज 4 हजार कॅलरीज घ्याव्या लागत होत्या. आणि इतक्या मोठ्या इनटेकसाठी त्याला एका दिवसात तब्बल 40 अंडी खावी लागत होती. त्यासोबतच त्याला जिममध्ये 8 तास व्यायाम करावा लागत होता. एक सामान्य माणूस दिवसातून तीन वेळा जेवतो. पण भल्लालदेव उभा करण्यासाठी राणा एकाच दिवसात आठ वेळा जेवण करावं लागत होतं. दर दोन तासांनी तो भातही खात होता. त्यामुळं एक अभिनेता म्हणून केवळ डायलॉग जमून फायदा नसतो, तर तशी शरीरयष्टी देखील बनवावी लागते आणि हे भल्लालदेवनं करून दाखवलं आहे.
View this post on Instagram
राणानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, या भूमिकेसाठी त्यानं आपलं वजन १०० किलोपर्यंत वाढवलं होतं. इतकं वजन वाढवल्यावर कुणाचंही पोट सहज बाहेर दिसेल. पण राणाने मेहनत घेतली. त्याने वजन वाढवलं खरं पण ते केवळ मसल्सच्या स्वरूपात दिसलं.
राणा दग्गुबातीने काही बॉलीवूड सिनेमात काम केलं. त्यानं बिपाशा बसुसोबतही एक चित्रपट केला आहे. अक्षय कुमारसोबतही त्यानं हाऊसफुल्ल 4 मध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर 'गाजी अॅटॅक' सारख्या कलात्मक सिनेमातंही त्यानं आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. पण त्याचा अॅक्शन अंदाजमधल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना अधिक भावतात. राणाने अलिकडेच कोरोना काळात लग्न केलं आहे. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bahubali