मुंबई, 10 ऑक्टोबर: सोशल मिडीयावर जसे कलाकार चर्चेत असतात तशी त्यांची मुलं त्यांच्यापेक्षा जास्त चर्चेत असतात. प्रसिध्द-गायक संगीतकार राहुल देशपांडे यांची लाडकी लेक रेणुका सोशल मिडीयार किती व्हायरल होते हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. तिचे अनेक गोड व्हिडिओज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. रेणुका (renuka deshpande) कधी बाबांसोबत मस्त गाणी गाते तर कधी अभिनय करते तर कधी नकला करताना दिसते. तिच्यापुढे तर बॉलिवूडचे स्टार किड्ससुध्दा देखील फिके पडतात. सर्वांच्या लाडक्या रेणुकाने तिच्या लाडक्या बाबाला (rahul deshpande Birthday Special) वाढदिवसाच्या खास संगीतमय अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. रेणुकाचा हा (happy birthday rahul deshpande) गोड अंदाज चाहत्यांना देखील आवडलेला आहे. आज राहुल देशपांडे यांचा वाढदिवस आहे. बाबांच्या वाढदिवसानिमित्त रेणुका कि बोर्डवर हॅपी बर्थ डे टु यू ची ट्युन वाजवताना दिसते आहे. एरवी राहुल यांच्याकडून विविध गाणी ऐकायची सवय असलेल्या चाहत्यांना रेणुकाचं हे गोड सरप्राईज आवडलं आहे. राहुल देशपांडेने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहत्यांनी देखील राहुल देशपांडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत रेणुकाचे कौतुक केले आहे.
राहुल देशपांडे यांची मुलगी रेणुका सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. तिचे विविध व्हिडिओ आपल्याला राहुल देशपांडे यांच्या फेसबुकच्या पेजवर पाहायला मिळतात. रेणुकाने रंग दो मोहे लाल… हे गाणं स्वतः गात त्यावर छान हावभावदेखील केले आहेत. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. वाचा : Bigg Boss Marathi 3 च्या घरातील ही मीनल शाह नक्की आहे तरी कोण? रेणुकाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून काही व्हिडिओ तर लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहेत तर हजाराहून अधिक लोकांनी ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत.