बॉलिवूडमध्ये (Bollywood) क्वीन (Queen) म्हणून प्रसिद्ध असणारी कंगना रणौत (Kangana Ranauat) आज आपला 34वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर सक्रीय असणारी कंगना तिथं आपली मतं बेधडकपणे मांडत असते. त्यामुळं अनेकदा ती वादात सापडते; पण तिचा रोखठोक अंदाज अनेकांना आवडतो
कंगनानं आपल्या मेहनतीच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. वयाच्या 22 व्या तिनं फॅशन (Fashion) या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार (National Award) पटकावला. यंदा तिच्या वाढदिवसाच्या आधी एक दिवस तिला आणखी दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (Best Actress) पुरस्कार मिळाला आहे. 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात (National Film Awards Ceremoney) तिला 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठीच्या पुरस्कारांमध्ये ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तिचा हा चौथा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे.
वाढदिवसाच्या एक दिवस आधी मिळालेल्या या खास भेटीमुळे कंगना अतिशय खूष आहे. तिनं एका व्हिडीओद्वारे प्रेक्षक आणि चाहत्यांचे तसंच पुरस्कार निवड समितीचेही आभार मानले आहेत. कंगनानं याआधी फॅशन, क्वीन आणि तनु वेड्स मनु रिटर्न्स’ या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे. याशिवाय कंगनाला चार फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
कंगनाचा जन्म 23 मार्च 1987 रोजी हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) मंडी जिल्ह्यातील सुरजपूर गावातील एका राजपूत परिवारात झाला. तिला रंगोली नावाची एक मोठी बहीण आणि अक्षत नावाचा लहान भाऊ आहे.
कंगनाचे वडील व्यावसायिक असून आई आशा रणौत शाळेत शिक्षिका आहेत. कंगनानं डॉक्टर व्हावं अशी तिच्या वडिलांची इच्छा होती मात्र ती बारावीत नापास झाली. त्यानंतर आई-वडिलांशी भांडून ती दिल्लीला आली. तिथं तिनं अभिनेत्री बनवण्याचा निर्णय घेतला आणि अथक संघर्षानंतर तिला यश मिळालं.
स्वत: एकटीच्या बळावर चित्रपटासाठी 100 कोटींचा व्यवसाय करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये कंगनाचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं
कंगनानं आतापर्यंत अनेक महिला व्यक्तिमत्वांवर आधारीत चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि त्यासाठी तिनं अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. स्त्री व्यक्तीरेखा केंद्रस्थानी असलेले अनेक चित्रपट आता बॉलिवूडमध्ये निर्माण होत आहेत.
आता तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता (Jaylalita) यांच्या जीवनावर आधारित 'थलाइवी' या चित्रपटात कंगनाने जयललिता यांची भूमिका साकारली असून, तो लवकरच प्रदर्शित होईल. आज या सिनेमाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या वक्तव्यांमुळे देखील चर्चेत आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक मुद्द्यावर ती आपली मतं परखडपणे मांडत आहे