मुंबई, 21मे- बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता कुटुंब म्हणून यश चोप्रा यांच्या कुटुंबाला ओळखलं जातं. या कुटुंबाने ‘यशराज फिल्म्स’च्या बॅनरखाली अनेक उत्कृष्ट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्रा ने वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत त्याकाळातील सर्वोत्कृष्ट चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. आदित्य चोप्राने आपल्या चित्रपटांचं बॅनरही वाढवलं आणि अनेक हिट चित्रपटही दिले आहेत. आदित्य चोप्रा आज त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. आदित्य चोप्राने बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत लग्न केलं आहे. आदित्यने राणी मुखर्जीसोबत दुसरं लग्न केलं होतं. हे लग्न करणं त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. वादविवादसुद्धा झाले होते. राणी मुखर्जीसोबतच्या लग्नामुळे आदित्य चोप्राला वडील यश चोप्रा आणि आई पामेला यांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं होतं. इतकंच नव्हे तर आदित्यने रागाच्या भरात घरसुद्धा सोडलं होतं असं म्हटलं जातं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदित्यने त्याची पहिली पत्नी पायल चोप्रा हिला घटस्फोट दिला होता. यानंतर राणी आणि आदित्य यांची मैत्री झाली आणि दोघे प्रेमात पडले. राणी मुखर्जीने 21 एप्रिल 2014रोजी आदित्य चोप्रासोबत लग्न केलं होतं. (हे वाचा: बोनी कपूरच्या एक्स-पत्नीची खास मैत्रीण होती रविना, सेटवर श्रीदेवीने वाढवली जवळीकता, अशी झालेली गोची ) मीडिया रिपोर्ट्सनुसार, यश चोप्रा त्यांचा मुलगा आदित्यचं पहिलं लग्न मोडण्याच्या विरोधात होते. आदित्य आणि पायलच्या लग्नानंतर दोघांच्या आयुष्यात खूप तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आदित्य चोप्राने पायलला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचे वडील यश चोप्रा यामुळे खूप नाराज होते. इतकंच नव्हे तर यश चोप्रा यांना राणीपेक्षा मुलगा आदित्यची पहिली पत्नी पायल सून म्हणून जास्त पसंत होती. त्यांनी तिला लेकीसारखं ठेवलं होतं. आणि त्यामुळेच ते घटस्फोटाच्या विरोधात होते. आदित्य चोप्राच्या घटस्फोटाचं कारणही राणीच असल्याचं सांगण्यात येतं. यश चोप्रानेही रागाच्या भरात आदित्यला घर सोडण्यास सांगितलं होतं. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, आदित्य चोप्राने आपलं घर सोडलं होतं. आणि तो तब्बल 1 वर्षे एका हॉटेलमध्ये राहात होता. यानंतर आदित्यच्या आईने त्या बापलेकातील संबंध पुन्हा सुधारले होते.
आदित्य चोप्राने 1995 मध्ये आलेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन करिअरची सुरुवात केली होती. आदित्यने आपल्या पहिल्याच चित्रपटातून लोकांना अक्षरशः वेड लावलं होतं. आदित्यचा पहिलाच चित्रपट सुपरहिट आणि आयकॉनिक चित्रपट बनला. या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोलची जोडीही प्रेक्षकांना खूप आवडली होती. यानंतर आदित्य चोप्राने 50 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. यासोबतच त्यांनी ‘रब ने बना दी जोडी’, ‘केअरफ्री’, ‘मोहब्बतें’ या चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं आहे.