मुंबई, 20 सप्टेंबर : गेल्या बऱ्याच दिवसांपासून ऑस्कर 2023 ची जोरदार चर्चा सुरु असलेली पहायला मिळत आहे. पुढच्या वर्षीच्या ऑस्करसाठी अनेक चित्रपटांच्या नावांची चर्चा रंगली होती. अखेर 2022 मध्ये परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी भारतातून कोणता चित्रपट अधिकृतपणे जाणार आहे, हे उघड झाले आहे. साऊथ चित्रपटांच्या नावाचा बोलबाला असताना ऑस्कर 2023च्या शर्यतीत गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. भारत सरकारने जाहीर केले आहे की गुजराती चित्रपट ‘छेलो शो’ ला ऑस्कर पुरस्कार 2023 साठी भारताकडून अधिकृत प्रवेश आहे. दिग्दर्शक पान नलिन यांचा गुजराती चित्रपट ‘छेलो शो’ पुढील वर्षीच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चित्रपटात किशोरवयीन मुलाच्या रुपेरी पडद्यावरील स्वप्नांची कथा आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाला वॅलाडोलिड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्ड स्पाइक पुरस्कार मिळाला होता.
Gujarati film "Chhello Show" is India's official entry for Oscars 2023: Gujarat Govt pic.twitter.com/RoJrMivRub
— ANI (@ANI) September 20, 2022
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाज ज्युरी, ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दरवर्षी देशातील सर्व भाषांमधील निवडक चित्रपटांपैकी एक चित्रपट पाठवते. या चित्रपटांपैकी कोणतेही पाच चित्रपट अंतिम टप्प्यात पोहोचतील आणि या पाच चित्रपटांना ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी नामांकन दिले जाते. दरम्यान, गुजराती सिनेमा छेल्लो शो हा भारताकडून ऑस्कर 2023 साठी अधिकृत एन्ट्री असणार आहे. या चित्रपटात भाविन राबरी, भावेश श्रीमाळी, रिचा मीना, दिपेन रावल आणि परेश मेहता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘आरआरआर’ आणि विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ सारख्या चित्रपटांचाही ऑस्कर 2023 च्या या यादीत समावेश आहे . पण, ‘छेलो शो’ या गुजराती चित्रपटाने दोन्ही चित्रपटांना बाजी मारत ऑस्करमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.