हिंदू दिनदर्शिकेच्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा होय. गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्ष. महाराष्ट्रात या सणाला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळेच मराठी कलाकारांनीसुद्धा अतिशय उत्साहात हा सण साजरा केला आहे.
मराठीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला आहे.
मराठी सेलिब्रिटींमधील गोड जोडी मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा लग्नांनंतरचा पहिला पाडवा अगदी उत्साहात साजरा झाला आहे.
आपल्या सर्वांची लाडकी अंजलीबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधरनेसुद्धा अगदी मराठमोळ्या वेशात गुढीपाडव्याचा उत्सव साजरा केला आहे.
मराठी बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरेनेसुद्धा गुढीपाडवा साजरा केला आहे आणि पारंपरिक वेशातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
अभिनेत्री सई लोकुरणेसुद्धा आपल्या पतीसोबत गुढीपाडवा साजरा केला आहे. लग्नानंतर हा तिचा पहिलाच पाडवा आहे.
मराठीतील अतिशय फिट आणि सुंदर अभिनेत्री माधवी निमकरनेसुद्धा गुढीपाडवा साजरा केला आहे. साडीमध्ये माधवी अतिशय खुलून दिसत आहे.