मुंबई, 21 फेब्रुवारी : आज सकाळी सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांना पूत्ररत्नाचा लाभ झाला. त्यानंतर मराठी अभिनय क्षेत्रातूनही गुड न्यूज आली आहे. होणार सून मी या घरची..या मालिकेतून प्रसिद्धीस आलेला शशांक केतकर (Shashank Ketkar) यांनी इन्स्टाग्रामवर बाळासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये शशांक खूप आनंदी दिसत आहे. यावर त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ऋग्वेद शशांक केतकर. म्हणजेच शशांकलाही पूत्ररत्नाचा लाभ झाला आहे. काही दिवसांपूर्वी शशांक केतकरने पत्नीसोबत एक फोटो शेअर केला होता. यामध्ये ती गर्भवती असल्याचं दिसत होती. आज 21 फेब्रुवारी रोजी शशांकच्या घरात लहानग्या ‘श्री’ ची एन्ट्री झाली आहे.
शशांकच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षावर सुरू आहे. अनेक सेलिब्रिटींनी तिच्या गुड न्यूजसाठी अभिनंदन केलं आहे.
सध्या शशांक केतकर त्याच्या नव्या मालिकाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. नव्या वर्षात त्याला नव्या मालिकेबरोबरच नव्या पाहुण्याची गुड न्यूज मिळाल्याने पुढील वर्ष त्याला अधिक आनंदी जावो, अशा शुभेच्छा दिल्या जात आहेत