मुंबई,17 सप्टेंबर- मराठीतील दमदार अभिनेता म्हणून गश्मीर महाजनीला ओळखलं जातं. ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा तो लेक आहे. गश्मीरने मराठीत ‘देऊळबंद’ सारखे दमदार चित्रपट केले आहेत. सध्या तो हिंदी मालिकांमध्ये आपली छाप पाडत आहे. काही दिवसांपूर्वी तो ‘इमली’ या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिकेत झळकला होता. ही मालिका तर लोकप्रिय झालीच सोबत गश्मीरलाही मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. गश्मीर आता ‘झलक दिखला जा’मध्ये आपल्या डान्सने प्रेक्षकांना वेड लावत आहे. गश्मीर महाजनी सध्या ‘झलक दिखला जा 10’ मध्ये एक जबरदस्त स्पर्धक म्हणून समोर आला आहे. आपल्या डान्सने त्याने लोकांना भुरळ पाडली आहे.परीक्षकसुद्धा गश्मीरचा डान्स पाहून थक्क झाले आहेत. नुकतंच कलर्स वाहिनीने एक नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये गश्मीरचा डान्स पाहून शोचे परीक्षक माधुरी दीक्षित, करण जोहरसोबत सर्वच इमोशनल झाले आहेत. या डान्स परफॉर्मन्सच्या माध्यमातून गश्मीरने आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाबाबत खुलासा केला आहे. आगामी एपिसोडमध्ये गश्मीरने आपल्या डान्सच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात आलेल्या वाईट अनुभवांबाबत सांगितलं आहे. यावेळी गश्मीरच्या आईसुद्धा उपस्थित आहे. गश्मीरच्या डान्सच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील त्या दिवसांची आठवण करुन त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहात आहेत. त्या दिवसांबाबत बोलताना त्यांनी म्हटलं, आम्ही पूर्णपणे कर्जत बुडालो होतो. कर्जदार घर सोडण्याची भाषा त्यांच्याजवळ करत होते. गश्मीरने अत्यंत कष्ट करुन सर्व कर्जाची परतफेड केली आहे.एक स्टारकिड असूनसुद्धा त्याच्यासाठी मनोरंजन सृष्टीत स्थान मिळवणं तितकसं सोपं नव्हतं. प्रचंड अडचणींचा सामना करुन आणि अनेक संकटांवर मात करुन गश्मीरने आज हे स्थान मिळवलं आहे. हे सर्व सांगताना गश्मीरच्या आईंना अश्रू अनावर झाले होते. हा प्रोमो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. इतकंच नव्हे तर गश्मीरचं नाव ट्विटरवर ट्रेंड करत आहे. ‘झलक दिखला जा’चा हा एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक झाले आहेत.
**(हे वाचा:** Bigg Boss 16 मध्ये दिसू शकते अमृता खानविलकर; परंतु निर्मात्यांसमोर ठेवलीय ‘ही’ अट ) गश्मीर महाजनीने 2010 मध्ये हिंदी चित्रपट ‘मुस्कुराके देख जरा’ मधून सिनेसृष्टीत पदर्पण केलं होतं. परंतु त्याला खरी ओळख मिळाली 2015 मध्ये आलेला मराठी चित्रपट ‘कॅरी ऑन मराठा’ मधून. सोबतच त्याच्या ‘देऊळबंद’मधील कामाचीही प्रचंड चर्चा झाली होती. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यानंतर गश्मीरने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.