जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Indian Idol Season12: कचऱ्यातलं सोनं चकाकलं! हाफिज आणि हबीबुरनं गाजवला इंडियन आयडॉलचा मंच

Indian Idol Season12: कचऱ्यातलं सोनं चकाकलं! हाफिज आणि हबीबुरनं गाजवला इंडियन आयडॉलचा मंच

Indian Idol Season12: कचऱ्यातलं सोनं चकाकलं! हाफिज आणि हबीबुरनं गाजवला इंडियन आयडॉलचा मंच

Garbage Picker Hafiz and Habibur Motivational Story: सच्ची कला हिऱ्याच्या तेजासारखीच लपून राहत नाही. या दोन भावांचं कथाही अशीच आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 मार्च : टीव्हीवरचा लोकप्रिय रिऍलिटी शो इंडियन आयडॉल 12 नं  (Indian Idol Season 12) अनेक नव्या, लहान गावातल्या गायकांना उजेडात आणलं. त्यांच्या प्रतिभेला मंच दिला. इंडियन आयडॉल 12 च्या मंचावर दोन प्रतिभावान कलाकारांना बोलावलं गेलं. त्यांनी आपलं कौशल्य यापूर्वीही जगाला दाखवलं आहे. (Inspirational Story of Garbage Picker Hafiz and Habibur) हे दोघे आहेत दिल्लीचा हाफीज आणि हबीबुर. हे दोघे तेच आहेत ज्यांचा व्हिडिओ आनंद महिंद्रा (Anand Mahindra Twitter) यांनी शेअर केला होता. हाफीज आणि हबीबुर दिल्लीच्या न्यू फ़्रेंड्स कॉलनीमध्ये कचरा वेचण्याचं काम करतात. इंडियन आयडॉलच्या मंचावर या दोघांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. (Garbage Picker Brothers Hafiz and Habibur) विशाल ददलानी यांनी या दोघांबाबत बोलताना म्हटलं, की आनंद महिंद्रा यांनी यांचा व्हिडिओ शेअर केला तेव्हा अनेकांनी मला टॅग करत सांगितलं, की यांना एकदा मंचावर बोलावलं पाहिजे. मग मी यांचा आवाज ऐकला आणि खरोखर थक्क झालो.दोघांच्या गायनाचं तिन्ही परीक्षक आणि जॅकी श्रॉफ यांनीही खूप कौतुक केलं.  (Anand Mahindra tweets Hafiz and Habibur singing)

इंडियन आयडॉलमध्ये बोलावलं गेलं यासाठी सगळेच हाफिज आणि हबीबुरला शुभेच्छा देत आहेत. नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एकानं दोघांबद्दल लिहिलं आहे, की हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, की तुमच्यात काही वेगळं करण्याची इच्छा असेल तर कुठलाच अडथळा तुम्हाला रोखू शकत नाही. हेही वाचा MBA Chaiwala! डिग्री सोडून चहा विकतोय हा तरुण; आज करोडोमध्ये आहे कमाई अजून एकजण म्हणाला, की यांची कलाच यांची खरी ओळख आहे, अनेकजण दोघांची संघर्षकथाही शेअर करत आहेत. (hafiz and habibur at indian idol) आनंद महिंद्रा यांनी दोन्ही भावांचा व्हिडिओ शेअर करत लिहिलं होतं, की ‘यांची प्रतिभा अजून कच्ची आहे आणि यांना प्रशिक्षणाची खूप गरज आहे. मी आणि रोहित या दोघांना संगीतात पुढं येण्यासाठी मदत करू इच्छितो. हेही वाचा मुलाला बेदखल करत हत्तीच्या नावावर केली 5 कोटीची संपत्ती, अतूट नात्याची अनोखी कथा दिल्लीत कुणी अशी व्यक्ती आहे का, जी यांच्यासाठी संध्याकाळचा एखादा संगीत शिक्षक शोधेल. कारण हे दोघेही दिवसभर काम करतात.’ महिंद्रा यांच्या ट्विटनंतर या दोघांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याबाबत बातम्याही झळकल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात