'गंगूबाई काठियावाडी' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, भन्साळी-आलिया विरोधात गंगूबाईच्या कुटुंबियांची न्यायालयात धाव

'गंगूबाई काठियावाडी' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, भन्साळी-आलिया विरोधात गंगूबाईच्या कुटुंबियांची न्यायालयात धाव

आलिया भट्टची (Alia Bhatt) मुख्य भूमिका असलेला संजय लीला भन्साळी (Sanjay leela Bhansali) यांचा 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट (Film) वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गंगूबाई काठियावाडी यांचा मुलगा बाबूजी रावजी शाह (Babuji raoji shah) यांनी हा खटला दाखल केला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 डिसेंबर: कोणताही चित्रपट प्रसिद्ध करायचा असेल तर संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali) आणि वाद (Controversy) हे समीकरण ठरलेलंच असतं. आताही आलिया भट्टची (Alia Bhatt) मुख्य भूमिका असलेला संजय लीला भन्साळी यांचा  'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाचं शूटिंग अद्याप पूर्ण झालं नाही, त्याआधीच हा चित्रपट कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. या चित्रपटामुळे संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. गंगूबाई काठियावाडी यांचा मुलगा बाबूजी रावजी शाह (Babuji raoji shah) यांनी हा खटला दाखल केला आहे.

संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त लेखक हुसेन झैदी, जेन बोर्गिस आणि भन्साळी प्रॉडक्शनच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशात जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचं शूटिंग मध्येच थांबविण्यात आलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा 'गंगूबाई काठियावाडीचं शूटिंग सुरू झालं आहे. हा चित्रपट गंगूबाई काठियावाडी यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटाची कथा ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकातून घेतली आहे. या चित्रपटाचं रात्रीचं शुटींग पूर्ण झालं आहे.

मिळालेल्या बातमीनुसार, गंगूबाईंचा मुलगा बाबूजी यानं या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 50 ते 69 वर आक्षेप घेतला आहे. यादरम्याच्या पृष्ठांत चुकीचं वर्णन केल्याचं त्यांच म्हणणं आहे. या याचिकेमध्ये बाबूजी यांनी असा आरोप केला की, हा भाग त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करीत आहे.

आलियाने आता तिच्या दुसर्‍या एका चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. ती राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटातही  दिसणार आहे. याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये ती सध्या व्यग्र आहे. याशिवाय आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातही भूमिका साकारणार आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

Published by: News18 Desk
First published: December 26, 2020, 3:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या