• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • BREAKING: कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, अखेर मुंबईत गुन्हा दाखल

BREAKING: कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, अखेर मुंबईत गुन्हा दाखल

Kangana Ranaut

Kangana Ranaut

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगणा रणौतविरुद्ध (Kangana Ranaut) खार पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 नोव्हेंबर- बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री कंगणा रणौतविरुद्ध   (Kangana Ranaut)  खार पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीख समाजाने कंगणा विरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शीख समाजाच्या भावना भडकवणारी पोस्ट सोशल मिडियावर केल्याप्रकरणी शीख समाजाच्या वतीने ही तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री कंगना रणौत गेली अनेक दिवस आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. नुकताच अभिनेत्री आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शीख समुदायाविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यांनतर हा वाद आणखी वाढला होता. दिल्लीतील शीख गुरुद्वारा व्यवस्थापनाने कंगनाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर शीखांसाठी वापरण्यात आलेल्या भाषा आणि विचारांवर नाराजी व्यक्त केली होती. वास्तविक कंगनाने किसान आंदोलनाचे वर्णन खलिस्तानी आंदोलन असे केले होते.
  Published by:Aiman Desai
  First published: