मुंबई, 13 ऑक्टोबर: कंगना रनौत आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. बॉलिवूडमधील नेपॉटिझम असो किंवा महाराष्ट्रातील राजकारण, कंगना नेहमीच विविध विषयांवर व्यक्त होत असते. काही वेळा तिला याचे गंभीर परिणामही भोगावे लागतात. एका ट्वीटमुळे कंगना रनौत (Kangna Ranaut)च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बॉलिवूडच्या या क्वीनविरोधात कर्नाटकमध्ये FIR दाखल करण्यात आली आहे. कर्नाटक कोर्टाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. काही दिवसांपूर्वी कंगनाने शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चाविरोधात ट्वीट केलं होतं. कंगना रानौतने या ट्वीटमधून शेतकऱ्यांचा अपमान केला असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे कर्नाटकात तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
कंगना रनौतवर कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या एफआयआर (FIR)मध्ये कंगनाने शेतकऱ्यांना टार्गेट करत ट्वीट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या एका मोर्चाबाबत ट्वीट केलं होतं. त्यावरुन अनेकांनी तिच्यावर टीकाही केली होती. काही वेळाने तिने ट्वीट सोशल मीडियावरुन काढून टाकलं होतं.
FIR registered against Bollywood actor Kangana Ranaut in Karnataka's Tumakuru district over a tweet allegedly targeting farmers protesting against the recently enacted central farm laws: Police
कंगनावर आयपीसी कलम 108, 153A आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या 'थलायवी'च्या शुटिंगमध्ये व्यस्त असलेली कंगना यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.