'निर्माते मला शारिरीक तडजोड करायला सांगत' सोफिया हयातचा धक्कादायक खुलासा

'निर्माते मला शारिरीक तडजोड करायला सांगत' सोफिया हयातचा धक्कादायक खुलासा

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोफियानं नेपोटीझमबाबत स्वतःचा अनुभव शेअर केला.

  • Share this:

मुंबई, 30 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटीझम वाद सुरू आहे. सुशांतनं वयाच्या 34 व्या वर्षीय या जगाचा निरोप घेतला. मागच्या काही काळापासून तो डिप्रेशनमध्ये होता आणि याचं कारण बॉलिवूडमधील नेपोटीझम असल्याचं बोललं जात आहे. अनेक आउटसायडर कलाकारांनी आतापर्यंत याबाबत आवाज उठवला आहे. त्यानंतर आता बिग बॉसची माजी स्पर्धक सोफिया हयात हिनं सुद्धा या वादात उडी घेतली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोफियानं स्वतःचा अनुभव शेअर केला.

स्पॉटबॉय-ईला दिलेल्या मुलाखतीत सोफिया म्हणाली, फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेपोटीझम बऱ्याच काळापासून आहे. मी परदेशातून आल्यानं मला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. बॉलिवूडच्या अनेक मोठ्या मेकर्सनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. 'डायरी ऑफ अ बटरफ्लाय' या सिनेमासाठी मला कास्ट करण्यात आलं होतं. काही मोठ्या फिल्म मेकर्सनी आणि अभिनेत्यांनी माझ्यासोबत शारिरीक तडजोड करण्याचा प्रस्तावही ठेवला होता. पण मी त्यांना असं करण्यास नकार दिला. मला कामाच्या वेळेनंतर भेटण्यासाठी बोलवलं जात असे.

 

View this post on Instagram

 

Hi guys! I have decided to put my best pictures and videos on onlyfans. The link is in my bio

A post shared by Sofia Hayat (@sofiahayat) on

मला विकण्याचे किंवा खरेदी करण्याचे प्रयत्न झाले

सोफिया म्हणाली, मी जेव्हा त्यांचं सांगणं ऐकलं नाही तेव्हा माझं काम काढून घेण्यात आलं आणि ते दुसऱ्यांना देण्यात आलं. सिनेमातील माझे सीन्स कापण्यात आले. काही सिनेमा बंद करण्यात आले. ते नेहमीच माझ्याकडे खरेदी करण्याचा किंवा विकण्याचा प्रयत्न करत असत. त्यानंतर मी माझ्या देशात परत जाण्याचा निर्णय घेतला मला नेपोटीझमची शिकार व्हायचं नव्हतं.

First published: June 30, 2020, 10:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading