प्रत्येक आई- बाबा आपल्या मुलांच्या आवडी पूर्ण करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात. अनेकदा शक्य नसतानाही फक्त मुलांसाठी ते आपल्या पोटाला चिमटा देत त्यांची आवड जपतात. बॉलिवूडकरही याला अपवाद नाहीत. सेलिब्रिटी आपल्या मुलांसाठी नेहमीच काही ना काही नवं करत असतात. काहींनी तर आपल्या मुलांना त्यांच्या वयाची गरज नसतानाही महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.
अभिषेक बच्चन- हे तर साऱ्यांनाच माहीत आहे की अमिताभ बच्चन यांचं आपल्या नातीवर किती प्रेम आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की अभिषेक आणि ऐश्वर्याने आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला तिला २५ लाख रुपयांची मिनी कूपर कार भेट म्हणून दिली होती आणि तिचा पहिला वाढदिवस दुबईत साजरा केला होता. या पार्टीचा खर्च जवळपास ५४ कोटी रुपये आला होता.
शाहरुख खान- बॉलिवूडचा बादशहा आणि त्याची तीनही मुलं नेहमीच चर्चेत असतात. २००९ मध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत शाहरुखने आपल्या दोन्ही मुलांना ६० लाख रुपयांची ऑडी कार भेट म्हणून दिली होती.
सैफ अली खान- तैमुरचा जेव्हा जन्म झाला तेव्हापासून तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आला आहे. आई- वडिलांपेक्षाही तो जास्त प्रसिद्ध आहे. नुकत्याच झालेल्या बालदिनाच्या निमित्तान सैफने तैमुरला एक जीप भेट म्हणून दिली. या जीपची मूळ किंमत १ कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. यात तैमुर आरामशीर बसू शकतो याची खास सोय करण्यात आली आहे.
शाहिद कपूर- बॉलिवूड अभिनेता शाहिदने मुलगी मीसा कपूरचा पहिला वाढदिवस लंडनमध्ये साजरा केला. या बर्थडे पार्टीसाठी त्याने पाण्यासारखा पैसा वाहिला होता.
आदित्य चोप्रा- प्रसिद्ध दिग्दर्शक आणि राणी मुखर्जीचा नवरा आदित्यने मुलगी आदिराच्या जन्मानंतर तिला मुंबईत एक प्रशस्त बंगला भेट म्हणून दिला होता.