बॉलिवूडचं चर्चित कपल फरहान अख्तर-शिबानी दांडेकर यांनी नुकतंच लग्नगाठ बांधली आहे. लग्नामध्ये काही मोजकेच लोक उपस्थित होते. त्यांनतर फरहान अख्तरने बॉलिवूड कलाकारांसाठी एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं.
यामध्ये जवळजवळ सर्व बॉलिवूड कलाकार सहभागी झाले होते. परंतु यामध्ये नववधू शिबानी दांडेकरने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. शिबानीने यावेळी फिकट निळ्या रंगाचा वेस्टर्न हाय स्लिट गाऊन परिधान केला होता.
यामध्ये शिबानी फारच बोल्ड दिसत होती. सध्या या ड्रेसची चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण त्याची किंमतसुद्धा तशीच आहे.
फरहानच्या पत्नीने परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत 1798 युरो आहे. अर्थातच भारतीय चलनात या ड्रेसची किंमत 1 लाख 51 हजार 208 इतकी आहे.
फरहान आणि शिबानी यांनी 18 फेब्रुवारीला जावेद अख्तर यांच्या खंडाळा फार्म हाऊसवर लग्नगाठ बांधली होती.