जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / साडी-लेहेंगा नव्हे तर वेस्टर्न गाऊनमध्ये दिसली फरहान अख्तरची नवरी, बहुचर्चित लग्नाचा First Photo आला समोर

साडी-लेहेंगा नव्हे तर वेस्टर्न गाऊनमध्ये दिसली फरहान अख्तरची नवरी, बहुचर्चित लग्नाचा First Photo आला समोर

साडी-लेहेंगा नव्हे तर वेस्टर्न गाऊनमध्ये दिसली फरहान अख्तरची नवरी, बहुचर्चित लग्नाचा First Photo आला समोर

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकरचा (Shibani Dandekar) विवाहसोहळा (Wedding) आज अखेर पार पडला. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी खंडाळा येथे लग्नगाठ बांधली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 फेब्रुवारी- गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला फरहान अख्तर   (Farhan Akhtar)  आणि शिबानी दांडेकरचा   (Shibani Dandekar)  विवाहसोहळा   (Wedding)  आज अखेर पार पडला. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी खंडाळा येथे लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांचे लग्न जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या खंडाळा फार्महाऊसवर पार पडले. दोघांनीही आपले लग्न अगदी साधेपणाने करायचे ठरवले होते, त्यामुळे त्यांनी ते पूर्णपणे खाजगी ठेवले आहे. या लग्नाला केवळ 50 लोक उपस्थित होते. फरहान अख्तरचा खास मित्र आणि बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याचे आई-वडील राकेश रोशन आणि पिंकी रोशन यांनीही लग्नाला हजेरी लावली होती. जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या फार्महाऊसवर लग्नाच्या विधी पार पडत आहेत. यावेळी शिबानी पारंपरिक लेहेंगा किंवा साडी परिधान न करता लाल आणि तपकिरी रंगाच्या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तर दुसरीकडे फरहान काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये दिसत आहे. तत्पूर्वी अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा मेहंदी आणि हळदी सोहळा चांगलाच रंगला. यावेळी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि अनुषा दांडेकर यांच्या डान्सचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये दोघीही जबरदस्त डान्स करताना दिसून आल्या होत्या. 17 फेब्रुवारीपासून फरहान-शिबानीच्या लग्नाचे कार्यक्रम सुरु झाले होते.यावेळी अमृता अरोरा, शबाना आझमी, अनुषा दांडेकर आणि रिया चक्रवर्ती यांनी उपस्थिती लावली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात