मुंबई, 25 फेब्रुवारी- प्रसिद्ध यूट्यूबर
(YouTuber) आणि टेलिव्हिजन होस्ट
(Tv Host) लिली सिंह
(Lilly Singh) सध्या रुग्णालयात दाखल आहे. लिलीने गुरुवारी याबाबत खुलासा केला आहे. अलीकडेच तिला ओव्हेरियन सिस्ट्सबद्दल
(Ovarian Cysts) माहिती मिळाली. त्यानंतर तिला रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले आहे. लिली सिंहने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती रुग्णालयात बेडवर झोपलेली दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना, लिली सिंहने चाहत्यांना तिच्या ओव्हेरियन सिस्टबद्दल अर्थातच अंडाशयात होणाऱ्या द्रव्यनिर्मितीबद्दल माहिती दिली आहे. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
लिली सिंहने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिच्या तोंडाला मास्क आहे. आणि ती बेडवर झोपलेली दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत आहेत. तर हा व्हिडीओ शेअर करत लिलीने लिहिलं आहे, 'आपत्कालीन कक्षात आज माझा शेवटचा दिवस आहे. कारण माझ्या अंडाशयात सिस्ट्स आहेत. मला ते समजू द्या. याचा मला महिन्यातून एकदा त्रास होतो. आणि याचा मासिक पाळीच्या वेळीही त्रास होतो. यामुळे मी अशक्त झाले आहे.
व्हिडिओ शेअर केल्यानंतर कॉमेडियनचे चाहते त्यावर जोरदार कमेंट करत आहेत आणि तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत. लिली सिंहच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. कमेंट करताना जॅकलिन फर्नांडिसने लिहिले- 'तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे.' तर तन्नाज इराणी लिहितात- 'लवकर बरी हो.' डीजे सुकेतू यांनी लिहिलंय- 'लिली सिंह, लवकर बरी हो.'
हॉवी मँडेलने लिली सिंहच्या पोस्टवर लिहिले - 'मी येथे आहे. जर तुम्हाला कशाचीही गरज भासली तर तुम्ही मला सांगू शकता.' अमांडा सेर्नीने लिहिले - 'हे खूप वेदनादायक आहे. मला आशा आहे की तुम्ही लवकर बरी होशील. लिलीच्या मित्रांनी आणि चाहत्यांनी तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.