मुंबई, 1o डिसेंबर : मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन झालं आहे. आज दुपारी 12 च्या सुमारास त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने सगळीचे एकच शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राच्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांची प्रकृती गेली काही दिवस खालावली होती. वृद्धापकाळामुळे त्यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुलोचना चव्हाण यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. सुलोचना चव्हाण यांचं त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथे निधन झालं. आज 12 वाजताच्या सुमारास त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात धाकटा मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्यामुळे त्यांचे चाहते, मित्र-परिवार, कुटुंब सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
हेही वाचा - मुंबईत मुलानेच केली प्रसिद्ध अभिनेत्रीची हत्या; मृतदेह बॉक्समध्ये भरून जंगलात फेकला, धक्कादायक कारण समोर
सांस्कृतित क्षेत्रात सुलोचना चव्हाण यांचं मोलाचं योगदान आहे. या योगदानासाठी त्यांना 'पद्मश्री' नागरी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या जाण्यानं एक चांगला आणि बुलंद आवाज आपण गमावला आहे. त्यांनी कस काय पाटील बर हाय का?, पाडाला पिकलाय आंबा, मला म्हणत्यात पुण्याची मैना, तुझ्या उसाला लागला कोल्हा, अशा अनेक लोकप्रिय गाण्यांना त्यांचा बुलंद आवाज दिला होता. ही गाणी खूप लोकप्रिय ठरली. आजही या गाण्यावर लोक थिरकल्याशिवाय राहत नाही.
दरम्यान, सुलोचना चव्हान यांनी त्यांच्या आवाजाने रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी म्हणून त्यांची ओळख होती. एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्या सुलोचना यांनी गायल्या आहेत. वयाच्या पाचव्या वर्षीपासून त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. मराठी व्यतिरिक्त त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये देखील त्यांच्या आवाजाची जादू दाखवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.