मुंबई, 11 नोव्हेंबर : बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज कॉमेडियन होऊन गेले ज्यांनी आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आजही त्यांचं नाव आवर्जुन तोंडात आल्याशिवाय राहत नाही. यातीलच एक प्रसिद्ध नाव म्हणजे कॉमेडियन जॉनी वॉकर. हिंदी चित्रपटसृष्टीतील या दिग्गज कॉमेडियनचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे 11 नोव्हेंबर 1926 रोजी इंदूरमध्ये झाला. त्यांचं आयुष्य खूप चढ-उतारांनी भरलेलं होतं. आज त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
50-70 च्या दशकातील चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडियन म्हणून जॉनी वॉकरची ओळख होती. आज ते आपल्यामध्ये असते तर त्यांचा 96 वा वाढदिवस साजरा केला असता. जॉनी वॉकरचं खरं नाव बदरुद्दीन जमालुद्दी काझी होतं. मात्र चित्रपट निर्माते गुरुदत्त यांनीच त्यांना जॉनी वॉकर बनवलं. जॉनीची स्टाईल अशी होती की त्याने काहीही केले नाही तरी लोक त्याला पाहून हसायला लागतात. 'सर जो तेरा चक्रये...' हे गाणे आजही प्रेक्षकांना आवडते. जवळपास 335 चित्रपटांमध्ये काम केलेल्या बद्रुद्दीनचा जॉनी वॉकर बनण्याचा प्रवासही खूप खासच होता.
हेही वाचा - एकेकाळी राखी बांधणारी श्रीदेवी कशी झाली Boney Kapoor ची पत्नी, फिल्मपेक्षा भारी लव्हस्टोरी
लहान वयातच जॉनी वॉकर यांनी वडिलांना मदत करण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळी ते बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करू लागले. मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या जॉनीचे लहानपणापासूनच अभिनेता होण्याचे स्वप्न होते. 1942 मध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत आले. 10 भावंडांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेला जॉनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बेस्ट बस सेवेत कंडक्टर म्हणून काम करत असे. या कामासाठी त्याला 26 रुपये मिळायचे. ते त्यांच्या विनोदी गप्पांनी बसमधील प्रवाशांचे मनोरंजन करायचे.
एकदा 'बाजी' चित्रपट लिहिणारे बलराज साहनीही जॉनी वॉकर असलेल्या बसमधून प्रवास करत होते. त्यांनी जॉनी वॉकरला पाहताच त्यांना चित्रपट निर्माते गुरुदत्तला भेटण्याचा सल्ला दिला. यानंतर जेव्हा जानी वॉकरने ज्येष्ठ चित्रपट निर्माते गुरु दत्त यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी त्यांना मादक कृती करण्यास सांगितले, जे जॉनी वॉकरने अगदी सहज केले आणि गुरु दत्तने त्यांना 'बाजी' चित्रपटात काम दिले. त्यांनंतर जॉनी वॉकरचा चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरु झाला.
जॉनीच्या चेहऱ्यावरील हावभाव, बोलण्याची वेगळी शैली आणि अभिनयातील साधेपणा प्रेक्षकांना खूप भावला. त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं. जॉनी वॉकरने आयुष्यात कधीच दारू प्यायली नाही, पण त्यांना दारू पिण्याची सवय असल्याप्रमाणे ते दारुड्याचे पात्र साकारायचे. जॉनी वॉकर यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1920 रोजी इंदूर येथे झाला, तर 29 जुलै 2003 रोजी मुंबईत निधन झाले. आजही प्रेक्षक त्यांची आठवण काढताना दिसतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Comedian, Comedy actor, Entertainment