मुंबई, 30 जानेवारी- छोट्या पडद्यावरील अभिनेता (Tv Actor) आणि लोकप्रिय डान्सर (Dancer) फैजल खानने (Faisal Khan) मनोरंजन सृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. फारच कमी वयात त्याने मोठं यश मिळवलं आहे. आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच फैजल खान आपल्या पर्सनल लाईफमुळेसुद्धा चर्चेत आला होता. आज त्याचा 23 वा वाढदिवस (Faisal Khan Birthday) आहे.यानिमित्ताने त्याच्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.
फैजल खानचा जन्म 30 जानेवारी 1999 मध्ये मुंबईमध्ये झाला होता. त्याला लहानपणापासूनच डान्सची प्रचंड आवड होती. त्याचे वडील एक रिक्षाचालक होते. तर त्याची आई गृहिणी. त्याला त्याच्या आई वडिलांनी नेहमीच डान्ससाठी प्रोत्साहन दिलं आहे. त्याने फारच लहान वयात डान्स शो मध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती. फैजल खान 'डान्स इंडिया डान्स' (Dance India Dance) लिटिल मास्टर्सच्या सीझन 2 चा विजेता देखील आहे.तसेच त्याने नच बलियेमध्येसुद्धा सहभाग घेतला होता.
11 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीसोबत जोडलं होतं नाव-
मध्यंतरी फैजल खानच्या पर्सनल लाईफची प्रचंड चर्चा झाली होती. कारण फैजलचं नाव एका 11 वर्षांपेक्षा मोठ्या अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं. फैजलसोबत जोडलं गेलेलं नाव दुसरं कोणी नसून अभिनेत्री स्नेहा वाघ होतं. स्नेहा वाघ (Sneha Wagh) बिग बॉस मराठीमुळे (Bigg Boss Marathi) प्रचंड चर्चेत आली होती. परंतु काही दिवसांपूर्वी फैजल आणि स्नेहाच्या अफेयर्सच्या चर्चा सुरु होत्या. फैजल आणि स्नेहा 'चंद्रगुप्त मौर्य' या मालिकेत एकत्र काम करत होते. या मालिकेत स्नेहा वाघ फैजल खानच्या आईची भूमिका साकारत होती.
View this post on Instagram
या मालिकेत काम करत असताना ते दोघे जवळ आल्याच्या चर्चा सुरु होत्या. इतकंच नव्हे तर स्नेहासोबत नाव जोडलं गेल्या नंतर फैजल खानचं ब्रेकअपसुद्धा झालं होतं. फैजलची गर्लफ्रेंड मुस्कान कटारियाने फैजल आणि स्नेहामध्ये जवळीकता वाढल्याचे आरोप केले होते. फैजल आपल्याला फसवत असल्याचा आरोप तिने केला होता. या सर्व प्रकारानंतर फैजल आणि मुस्कानचा ब्रेकअप झाला होता. नंतर स्नेहा आणि फैजलने या सर्व विषयावर मौन सोडत या गोष्टी फक्त अफवा असल्याचं म्हटलं होतं. या मध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dancer, Entertainment, Tv actor