मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

HBD: वडील होते रिक्षाचालक, Dance च्या जोरावर Faisal Khan ने मिळवली इतकी संपत्ती

HBD: वडील होते रिक्षाचालक, Dance च्या जोरावर Faisal Khan ने मिळवली इतकी संपत्ती

Happy Birthday Faisal Khan: फैजल खान आज आपला 23 वा वाढदिवस   (23rd Birthday)  साजरा करत आहे.

Happy Birthday Faisal Khan: फैजल खान आज आपला 23 वा वाढदिवस (23rd Birthday) साजरा करत आहे.

Happy Birthday Faisal Khan: फैजल खान आज आपला 23 वा वाढदिवस (23rd Birthday) साजरा करत आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 30 जानेवारी-  डान्समधून  (Dance)  आपल्या करिअरची सुरुवात करणारा आणि कमी वयात प्रचंड लोकप्रियता मिळवणारा कलाकार म्हणजे फैजल खान   (Faisal Khan)   होय. फैजल खान आज आपला 23 वा वाढदिवस   (23rd Birthday)  साजरा करत आहे. फैजल खान हा टीव्ही अभिनेता असण्यासोबतच उत्तम डान्सर आहे. तो 'डान्स इंडिया डान्स'   (Dance India Dance)  लिटिल मास्टर्सच्या सीझन 2 चा विजेता देखील आहे. फैजल खानने लहानपणापासूनच आपला ठसा उमटवला आहे. त्याने 'नच बलिए 9' मध्येही भाग घेतला होता. मात्र, दुखापतीमुळे त्याला शो मध्येच सोडावा लागला होता. नृत्यासोबतच फैजल खानने अभिनय विश्वातही प्रवेश केला आहे. त्यानं 'चंद्रगुप्त मौर्य', 'महाराणा प्रताप' यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे.सोबतच फैजलने 'प्रेम कहाणी' हा मराठी चित्रपटदेखील केला आहे.

फैजल खान एका सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा आहे. परंतु आपल्या करिअरमध्ये त्याने आपल्या मेहनतीने खूप काही साध्य केलं आहे. फैजल खानचे वडील एक रिक्षाचालक होते.परंतु आज त्यांच्याकडे स्वतः च्या हक्काचे घर स्वतःचे घर आणि एक आलिशान कारदेखील आहे. 'डान्स इंडिया डान्स' शो दरम्यानही गीता कपूर आणि टेरेन्स लुईस यांच्यासह सर्व परीक्षक त्याचं खूप कौतुक करत असत.

View this post on Instagram

A post shared by Faisal Khan (@faisalkhan30)

फैजल खान सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तो अनेकदा आपल्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या डान्सचे व्हिडिओही खूप व्हायरल होत असतात. फैजल खान अनेकदा अनेक स्टार्ससोबत त्याचे व्हिडिओ शेअर करत असतो. फैजलने सांगितले की त्याचे वडील रिक्षाचालक आहेत आणि आई गृहिणी आहे. दोघेही त्याच्या डान्सला सपोर्ट करत असतात. त्याच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, आपल्या मुलाला डान्स करताना पाहून ते खूप प्रेरित होतात.

(हे वाचा:गेहेराइयां ते थ्रिलर सीरिज फेब्रुवारी महिन्यात OTT वर असणार मनोरंजनाची मेजवानी)

फैजल सांगतो की त्याचे वडील आता रिक्षा चालवत नाहीत. परंतु आजही त्यांना रिक्षा चालवायला आवडतो. फैजल पूर्णपणे मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्याने आपल्या कमाईतून एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. याशिवाय फैजलकडे दोन आलिशान कार आणि एक बाईकही आहे.

First published:

Tags: Dancer, Entertainment, Tv actor