मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /जुन्या शनायानं नवीला काय दिला सल्ला?

जुन्या शनायानं नवीला काय दिला सल्ला?

खरं तर या व्यक्तिरेखेवर अभ्यास करायला ईशाला फारसा वेळच मिळाला नाही. 29 आॅगस्टलाच निर्णय झाला आणि त्याच दिवशी शूटिंगला सुरुवात झाली.

खरं तर या व्यक्तिरेखेवर अभ्यास करायला ईशाला फारसा वेळच मिळाला नाही. 29 आॅगस्टलाच निर्णय झाला आणि त्याच दिवशी शूटिंगला सुरुवात झाली.

खरं तर या व्यक्तिरेखेवर अभ्यास करायला ईशाला फारसा वेळच मिळाला नाही. 29 आॅगस्टलाच निर्णय झाला आणि त्याच दिवशी शूटिंगला सुरुवात झाली.

    मुंबई, 3 सप्टेंबर : ती आली, नुसती आली नाही तर बाईक चालवत आली आणि तिनं जिंकलं. हो, आम्ही 'माझ्या नवऱ्याची बायको'मधल्या शनायाबद्दल बोलतोय. अर्थातच नवी शनाया. म्हणजेच ईशा केसकर. जय मल्हार या गाजलेल्या मालिकेत ईशानं बानू साकारली होती. मग त्याच वाहिनीवर तिनं शनाया कशी स्वीकारली?

    आमच्याशी बोलताना ईशा म्हणाली, ' खूपच इन्स्टंट निर्णय होता तो. खरं तर रसिका माझी मैत्रीण. मला जेव्हा कळलं की ती मालिका सोडून परदेशी चाललेय, तेव्हा मीही हा विचार करत होते, की आता नवी शनाया कशी आणणार? कोण करणार ही भूमिका? ' ईशाच्या या मनातल्या प्रश्नाचं उत्तर चॅनेलनं तिला लगेचंच दिलं. तिलाच या भूमिकेबद्दल विचारलं गेलं.

    ईशा म्हणते, ' मी दिवसभर अनेकांशी बोलले. अनेक कलाकारांशी बोलले. पण सगळ्यांनीच मला पटवून दिलं की ही भूमिका मी करू शकेन म्हणून.'

    खरं तर या व्यक्तिरेखेवर अभ्यास करायला ईशाला फारसा वेळच मिळाला नाही. 29 आॅगस्टलाच निर्णय झाला आणि त्याच दिवशी शूटिंगला सुरुवात झाली. ईशाची शनाया कशी आहे? यावर ईशा सांगते, ' या शनायाचा अॅटिट्यूड बदलतोय. ती फनी, थोडीशी वेडी आहेच. पण आता ती वेगळी वागणारही आहे.'

    ईशा म्हणते, ' मला रसिकाच्या शनायाला धक्का लावायचा नाहीय. पण हे एक आव्हान आहे. त्यात प्रयोग करायला मला आवडेल. लोकांचं काय म्हणणं आहे, त्याप्रमाणे मी बदल करेन.'

    ईशानं नव्या शूजचं उदाहरण दिलं. ती म्हणाली, ' नवे शूज पायात फिट बसेपर्यंत चावतात, चपला आवाज करतात. पण थोडा संयम ठेवला तर ते फिट बसतात. लोकांनीही माझ्या व्यक्तिरेखेबद्दल थोडा संयम दाखवला पाहिजे.'

    ईशाची बानू खूप लोकप्रिय झाली होती. पण आता बानू आणि शनाया खूप वेगळ्या आहेत. ईशा सांगते, ' बानू नि:स्वार्थी आहे, तर शनाया स्वार्थी आहे. ' शनायाचे काही शब्द म्हणजे गुड फाॅर नथिंग, ओल्ड फर्निचर, आॅरेज उच्चारताना ईशाला गंमत वाटतेय.

    ईशा स्वत: कशी आहे ? 'मी कुठलीही परिस्थिती लगेच स्वीकारते.' ईशा सांगतेय. ' माझ्यात निरीक्षण शक्ती आहे. मी माणसांचं निरीक्षण करते. खरं कोण, परकं कोण हे मला लगेच कळते.'

    शनायाच्या व्यक्तिरेखेसाठी मला स्वत:ला मेनटेन ठेवावं लागणार आहे, कारण ही शनाया आधुनिक आहे, ईशा सांगते.

    रसिका म्हणजे पहिली शनाया ईशाची पक्की मैत्रीण आहे. ती अमेरिकेला जाणार म्हणून ईशाला वाईटही वाटतंय. आणि रसिकाही ही भूमिका सोडताना संवेदनशील बनली होती. ती ईशाला म्हणाली, 'टेक केअर आॅफ माय बेबी' आणि ईशा आता तेच करायला सज्ज झालीय.

    PHOTOS : बिग बींच्या लेकीनं उघडलं फॅशन स्टोअर, कोणी कोणी लावली हजेरी?

    First published:

    Tags: Rasika sunil