छोट्या पडद्यावरील प्रचंड गाजलेल्या 'पवित्र रिश्ता' मालिकेचा दुसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी मालिकेतील व्यक्तिरेखांचा फर्स्ट लुक सर्वांसमोर आला आहे.
अंकिता लोखंडे म्हणजेच अर्चनाचा हा लुक असणार आहे. पहिल्या भागाप्रमाणेच यातसुद्धा अर्चना अशीच असणार आहे.
अर्चना प्रमाणेच मानवचा सुद्धा सेम टू सेम तोच लुक असणार आहे. हा लुक व्हायरल होताच चाहत्यांना अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आठवण झाली आहे.
पवित्र रिश्ता 2 मध्ये काही नवीन चेहऱ्यांचाही समावेश असणार आहे. लवकरच zee 5 वर आपल्याला 'पवित्र रिश्ता 2' पाहायला मिळणार आहे.