मिस युनिव्हर्स ऑस्ट्रेलिया 2020 मारिया थट्टिल सध्या खूपच चर्चेत आहे. मारियाने नुकताच काही मेसेजचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेयर केले होते. ते सध्या तुफान व्हायरल होतं आहेत. हे मेसेज एका मुलांच्या ग्रुपचे आहेत, ज्यामध्ये चुकून मारियाला करण्यात आलं होतं.
या ग्रुपमध्ये महिलांबद्दल चुकीची भाषा वापरली जात होती. शिवाय महिलांसाठी असलेली पुरुषीवृत्तीही दाखवण्यात येत होती. त्यामुळे मारिया नाराज झाली आहे.
मारियाच्या मते, या ग्रुपमध्ये मू;ळे ज्या पद्धतीने महिलांविषयी बोलते होते, 'ते पाहून वाटतं की यांच्यासाठी महिला या फक्त एखाद्या मांसाच्या तुकड्यासमान आहेत दुसरं काहीच नाही.
मारियाने जेव्हा या ग्रुपमध्ये महिलांविरुद्ध होणाऱ्या संभाषणावर आवाज उठवला तेव्हा त्यातील एकाने तिला प्रतिक्रिया दिली.
मारिया म्हणते मी त्या ग्रुपमध्ये सहभागी होऊन अगदी चकित झाले होत. आणि मेसेज पाहून मला घृणा होतं होती.
मी खूपच दुखी झाले पाहून की, जेव्हा मी या विषयावर बोलण्याचा प्रत्यन केला, तेव्हा कोणीही मला कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
या ग्रुपमधील फक्त एका व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच मुलाने काहीचं प्रतिक्रिया दिली नाही. मारियाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याचं स्पष्टीकरण केलं होतं.
मारिया म्हणते, 'या ग्रुपमध्ये सहभागी झाल्याने मला समजलं की आजही पुरुषांच्या मनात स्त्रियांबद्दल किती घृणा आहे'.