मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

BB OTTमध्ये सनी लियोनीनं स्पर्धकांना दिला इतका बोल्ड टास्क, पाहून सर्वच झाले थक्क, पाहा VIDEO

BB OTTमध्ये सनी लियोनीनं स्पर्धकांना दिला इतका बोल्ड टास्क, पाहून सर्वच झाले थक्क, पाहा VIDEO

बिग बॉस OTTच्या घरात नुकताच अभिनेत्री सनी लियोनीने हजेरी लावली होती.

बिग बॉस OTTच्या घरात नुकताच अभिनेत्री सनी लियोनीने हजेरी लावली होती.

बिग बॉस OTTच्या घरात नुकताच अभिनेत्री सनी लियोनीने हजेरी लावली होती.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 31 ऑगस्ट- छोट्या पडद्यावरील बिग बॉस हा शो खूपच लोकप्रिय आहे. हा शो नेहमीच आपल्या स्पर्धकांमुळे, त्यांच्या वादविवादांमुळे आणि विचित्र टास्कमुळे चर्चेत असतो. यावेळी बिग बॉस 15 एका नव्या रुपात आपल्या भेटीला आला आहे. बिग बॉस यावेळी OTT(Bigg Boss OTT) स्वरुपात पाहायला मिळत आहे. BB OTT मध्ये अनेक ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरात अभिनेत्री सनी लियोनीने(Sunny Leone) एन्ट्री केली होती. सनीने यावेळी स्पर्धकांना असं काही करायला लावलं की सर्वचं लाजेनं पाणीपाणी झाले.
View this post on Instagram

A post shared by Voot (@voot)

बिग बॉस OTTच्या घरात नुकताच अभिनेत्री सनी लियोनीने हजेरी लावली होती. सनी लियोनी बॉलिवूडची सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. सनी नेहमीच आपल्या हॉटनेसने सर्वांना घायाळ करते. आत्ता स्वतः सनीने बिग बॉसच्या घरात हजेरी लावलीय म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग होणं साहजिक होतं. सनीने यावेळी घरातील स्पर्धकांना एक टास्क करण्यास सांगितलं होतं. हा टास्क पाहून सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या होत्या. इतकचं नव्हे तर यातीलचं स्पर्धक असणारी दिव्या अग्रवालसुद्धा हा टास्क पाहून लाजेनं पाणीपाणी झाली होती. (हे वाचा:  टीव्हीची बोल्ड क्वीन निया शर्माची BB OTTमध्ये होणार तुफानी एन्ट्री) वूटने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये सनी लियोनी BB स्पर्धकांना एक टास्क करण्याचं आवाहन देते. हा टास्क खुपचं विचित्र असतो. टास्कमध्ये सनी सांगते की एक नारळ दोन स्पर्धकांच्या मध्ये धरायचा आणि त्याला मेंटेन करत तो आपल्या तोंडापर्यंत घेऊन यायचा. हा टास्क करताना स्पर्धकांनामध्ये खूपच जवळीकता वाढते. आणि त्यामुळे हा टास्क अतिशय बोल्ड होतो. टास्क पाहता असताना स्पर्धक दिव्या अग्रवाल खूपच ऑड फील करत असते. हा टास्क 2 कनेक्शनमध्ये करायचा होता. आणि दिव्याचा कनेक्शन असलेला जीशान खान घराबाहेर गेल्यामुळे तिला या टास्कमध्ये सहभागी होता आलं नाही.
First published:

Tags: Bigg Boss OTT, Sunny Leone

पुढील बातम्या