Home /News /entertainment /

एम्मा चेम्बरलेनने मेट गालामध्ये घातला होता चक्क Patiala Necklace, तुम्हाला माहितेय का त्याची कथा?

एम्मा चेम्बरलेनने मेट गालामध्ये घातला होता चक्क Patiala Necklace, तुम्हाला माहितेय का त्याची कथा?

फॅशनच्या सोहळ्यात एम्माने अशी अँटिक ज्वेलरी (Antique Jewellery) परिधान केल्यामुळे नेटिझन्सना आश्चर्याचा धक्का बसला होता. एम्माच्या स्टाइल स्टेटमेंटमुळे इंटरनेटवर एवढी खळबळ का उडाली, याची थोडी माहिती घेऊ या.

     मुंबई, 10 मे-  मेट गाला 2022च्या रेड कार्पेट लूकसाठी अमेरिकन यू-ट्यूबर एम्मा चेंबरलेनने (Emma Chamberlain) एक दागिना परिधान केला होता. तो दागिना पतियाळाचे महाराज भूपिंदरसिंग (Maharaja of Patiala Bhupindersingh) यांचा होता. फॅशनच्या सोहळ्यात एम्माने अशी अँटिक ज्वेलरी (Antique Jewellery) परिधान केल्यामुळे नेटिझन्सना आश्चर्याचा धक्का बसला होता. एम्माच्या स्टाइल स्टेटमेंटमुळे इंटरनेटवर एवढी खळबळ का उडाली, याची थोडी माहिती घेऊ या. 20 वर्षांच्या एम्माने जो नेकलेस मेट गालामध्ये (Met Gala 2022) घातला होता, तो कार्टियर (Cartier) या फ्रेंच ज्वेलरी हाउसने तिला दिला होता. तो चोकर (Choker) पतियाळाचे महाराज भूपिंदरसिंग यांचा होता. त्यांच्याकडे डी बीअर्स हिरा होता. हा हिरा जगातला सातव्या क्रमांकाचा सर्वांत मोठा हिरा मानला जातो. तो हिरा जडवून नेकलेस/चोकर बनवण्याचे महाराजांनी ठरवलं. त्यानुसार 1928 साली तो बनवण्यात आला. हा नेकलेस पतियाळा नेकलेस (Patiala Necklace) म्हणून ओळखला जाऊ लागला. या नेकलेसमध्ये प्लॅटिनमच्या पाच साखळ्या असून, त्यात 2930 हिरे आणि काही बर्मीज रुबीजदेखील आहेत. हा नेकलेस/चोकर बनवण्यासाठी महाराजांनी कार्टियरशी संपर्क साधला. 'ट्रिब्युन'च्या वृत्तानुसार नेकलेसचं वजन 1000 कॅरेट्सपेक्षा जास्त होतं. त्याच्या मध्यभागी पिवळ्या रंगाचा 234.6 कॅरेट्सचा डी बीअर्स (De Beers Diamond) हिरा होता. हा हिरा गोल्फ बॉलच्या आकाराचा होता. पतियाळा नेकलेस तयार करण्याचा प्रोजेक्ट कार्टियरला तितकासा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरला नाही. कारण महाराजांनी त्यासाठीचे बहुतांश महागडे हिरे आणि रत्नं आपल्या स्वतःच्या खजिन्यातलीच दिली होती; पण त्या प्रोजेक्टमुळे कार्टियरची पाश्चिमात्य देशांतली प्रतिमा अधिक उंचावायला मदत झाली. जॅक्स कार्टियरने (Jacques Cartier) भारतात येऊन भारतातल्या सत्ताधीशांकडचं हिऱ्या-माणकांचं कलेक्शन पाहिलं, तेव्हा त्याने ते सारं पाश्चिमात्य देशांना दाखवलं. त्यांनी ते कधीच पाहिलं नव्हतं. महाराजा भूपिंदरसिंग यांची ज्वेलरी जेव्हा कार्टियरने 13 Rue de la Paix इथल्या प्रदर्शनात प्रदर्शित केली, तेव्हा जगभरातल्या व्यक्ती ते पाहण्यासाठी तिथे आल्या होत्या.
    1948 साली हा नेकलेस पतियाळाच्या महाराजांच्या खजिन्यातून अचानक हरवल्याचं समोर आलं. त्यानंतर 34 वर्षांनी, 1982 साली डी बीअर्स हिरा गूढरीत्या Sotheby’s auction मध्ये पुन्हा दिसला, मात्र नेकलेसशिवाय. त्या वेळी त्याचं मूल्य 30 लाख डॉलर्स एवढं होतं. त्यानंतर 16 वर्षांनी लंडनमधल्या एका छोट्या अँटिक शॉपमध्ये त्या नेकलेसचा काही भाग दिसला. त्यात डी बीअर्स आणि अन्य मोठे हिरे नव्हते. त्यानंतर तो नेकलेस कार्टिअरने विकत घेतला. त्यांनी त्यातल्या गहाळ झालेल्या हिऱ्यांच्या जागी त्यांच्या प्रतिकृती बसवल्या. असं सांगितलं जातं, की पतियाळा नेकलेस जर त्याच्या मूळ रूपात आज अस्तित्वात असता, तर त्याची किंमत किमान 30 दशलक्ष डॉलर्स एवढी असली असती.
    First published:

    Tags: Entertainment, Hollywood

    पुढील बातम्या