मुंबई, 25 नोव्हेंबर: बहुप्रतिक्षित दुर्गामती: द मिथ (Durgamati: The Myth) सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या सिनेमाची बऱ्याच काळापासून चर्चा रंगली होती. दुर्गामती: द मिथ या सिनेमामध्ये भूमि पेडणेकरची (Bhumi Pednekar) मुख्य भूमिका असणार आहे. भूमि पेडणेकर पहिल्यांदात आपल्याला वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा तेलूगु सिनेमाचा रिमेक आहे. भागमती असं मुळ चित्रपटाचं नाव आहे. हा सिनेमा 11 डिसेंबर रोजी Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांनी हॉरर आणि सस्पेन्स सिनेमाचा आनंद घेता येणार आहे. 'सगळ्यांचा बदला घेण्यासाठी दुर्गामती येतेय.' अशी टीझलाइन या भूमिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली होती. त्यामुळे अर्थातच हा सिनेमा सूडकथेवर आधारित असेल हे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी भूमिने या सिनेमाचं पोस्टर स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलं होतं. या आधी सिनेमाचं नाव फक्त ‘दुर्गामती’ असं ठेवण्यात आलं होतं. आता ते बदलून दुर्गामती: द मिथ असं ठेवण्यात आलं आहे. मुळ चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये अनुष्का शेट्टी झळकली होती. यामध्ये अनुष्का शेट्टी आयएएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती तिच्यामध्ये राणी नावाच्या तरुणीचा आत्मा तिच्या अंगात शिरतो. असं दाखवण्यात आलं होतं.
दुर्गामती: द मिथ या सिनेमामध्ये भूमि पेडणेकरसोबतच अर्शद वारसी, माही गिल, जिशू सेनगुप्ता, करण कपाडिया हे कलाकार महत्वाच्या भूमिकेमध्ये आहेत. अक्षय कुमार आणि भूषण कुमार यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.